आरोग्य

लॅपटॉप, कम्प्युटरवर काम करून मान- पाठ आखडून जाते, ३ प्रकारचे स्ट्रेचिंग करा अंग मोकळं होईल

ज्यांना ८- ९ तास सतत लॅपटॉप, कम्प्युटरवर काम करावं लागतं अशा तरुण पिढीला मान- पाठ- कंबर आखडून जाण्याचा त्रास वाढला आहे. दिवसातला जास्तीतास्त वेळ बसून काम करायचं, त्यात पुन्हा दुचाकी, चारचाकी गाडी चालविण्याचं वाढलेलं प्रमाण, त्यातही रस्त्यावरचे खड्डे टाळत केलेला प्रवास, यामुळे अंग जास्त आखडून जातं. मान, पाठ, कंबर गळून जाते. वारंवार दुखते. हा त्रास कमी करण्यासाठी व्यायाम करण्याची गरज असते. पण प्रत्येकाला व्यायामासाठी वेळ काढणं जमत नाही. म्हणूनच हे काही साधे सोपे आणि झटपट होणारे स्ट्रेचिंगचे प्रकार पाहा यामुळे आखडून गेलेलं अंग मोकळं होईल आणि मान, पाठ, कंबरदुखीही थांबेल.

 

मान, पाठ, कंबर दुखत असेल तर कोणते व्यायाम करावे?

१) मानेचे व्यायाम

मानेचे व्यायाम तुम्ही झटपट करू शकता. अगदी ऑफिसच्या खुर्चीमध्ये बसल्याबसल्याही हे व्यायाम करता येतील. यामध्ये मान उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने मागच्या बाजुने आणि पुढच्या बाजुने फिरवणे, वर पाहाणे- खाली पाहाणे, डावीकडे आणि उजवीकडे पाहाणे, एकदा उजव्या खांद्याकडे तर एकदा डाव्या खांद्याकडे झुकविणे असे व्यायाम तुम्ही करून शकता.

२) पाठीच्या कण्याचा व्यायाम

पाठ- कंबर मोकळी होण्यासाठी तुम्ही कॅट- काऊ पोज किंवा मार्जरासन करू शकता. याशिवाय सरळ ताठ उभे राहा. दोन्ही हात पाठीमागे घेऊन एकमेकांमध्ये बांधा आणि छाती पुढे काढून, खांदे मागे ओढून आता मागच्या बाजुने जास्तीतजास्त स्ट्रेच करा. याशिवाय तुम्ही मच्छिंद्रासन, वृक्षासनही करू शकता. बालासन, भुजंगासन असे मान, पाठ, कंबर मोकळे करणारे आसनही उपयुक्त ठरतात.

३) सुर्यनमस्कार

दिवसाच्या सुरुवातीला सुर्यनमस्कार घातल्यानेही खूप फरक पडतो. १२ सुर्यनमस्कार घालावे. पण एवढा वेळ तुमच्याकडे नसेल तर ५ किंवा ७ सुर्यनमस्कारही तुम्ही घालू शकता. यामुळे संपूर्ण शरीराचाच व्यायाम होऊन अंग मोकळं होण्यास मदत होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

9 तास ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

10 तास ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

10 तास ago

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…

10 तास ago

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर मीनाक्षी शिंदेंचा पलटवार

ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते…

10 तास ago

ग्रामसभेत युवकाने प्रश्न विचारल्यावर माजी सरपंच संतापले अन् थेट भिडले…

जळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी…

20 तास ago