मुंबई : सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्क रचनेत सुधारणा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निर्देशानुसार ही कार्यवाही करण्यात येणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विद्यापीठाने जाहीर केलेल्या शुल्क रचनेबाबत विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेल्या निवेदनांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. १८) मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी अपर मुख्य सचिव श्री. रेड्डी यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि शासनाची उच्च व तंत्रशिक्षण सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची भूमिका लक्षात घेऊन शुल्क रचनेची फेररचना करण्याचे निर्देश देण्यात आले.
विद्यार्थ्यांना शासनाच्या शिक्षण शुल्क परतावा योजनेचा अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी शुल्क नियामक प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित शुल्क रचना करण्याच्या सूचना विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शुल्क रचनेतील ‘इतर शुल्क’ शैक्षणिक शुल्कामध्ये समाविष्ट करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
या निर्णयाचा विशेष लाभ इतर मागासवर्गीय (OBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (SEBC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना होणार आहे. सुधारित शुल्क रचनेमुळे शासनाच्या शिक्षण शुल्क परतावा योजनेचा अधिकाधिक लाभ विद्यार्थ्यांना मिळण्यास मदत होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी शुल्क रचनेत सुधारणा करण्याबाबत मार्गदर्शन व निर्देश दिल्याबद्दल सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ प्रशासनाने राज्य शासनाचे आभार मानले आहेत.
राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…
मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…
संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…
मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…
ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते…
जळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी…