आरोग्य

झोपही गाढ लागेल आणि तोंडाची दुर्गंधीही होईल कमी, नियमित खा स्वयंपाकघरातला ‘हा’ एक मसाला

आपल्या किचनमध्ये असे अनेक मसाले असतात जे पदार्थांची टेस्ट तर वाढवतातच, सोबतच आपल्या आरोग्यालाही अनेक फायदे देतात. या मसाल्यांमध्ये असे अनेक पोषक तत्व असतात, जे औषधीसारखं काम करतात. त्यामुळेच आयुर्वेदातही या मसाल्यांना खूप महत्व आहे. मसाल्यांमधील हिरवी वेलची आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. वेगवेगळ्या भाज्या, पदार्थांमध्ये वेलचीचा वापर केला जातो. सोबतच वेलची मुखवास म्हणूनही वापरली जाते. दिसायला छोटी असली तरी वेलचीमध्ये भरपूर पोषक तत्व असतात. यातील पोषक तत्वांमुळे इम्यूनिटी बूस्ट होते. वेलची नियमितपणे खाल्ल्यास झोपण्याची क्वालिटी सुधारते आणि तोंडाची दुर्गंधी दूर होण्यासही मदत मिळते. सोबतच इतरही अनेक फायदे मिळतात.

हिरव्या वेलचीचे फायदे

झोप येण्यास मदत मिळते 

वेलचीमध्ये असे पोषक तत्व असतात, जे चांगली झोप येण्यास मदत करतात. अशात झोपण्याआधी दुधात वेलची टाकून प्यायल्यास किंवा नुसती वेलची चघळल्यास चांगली झोप लागले. वेलचीमुळे स्ट्रेस कमी होते आणि शरीर रिलॅक्स होतं. ज्यामुळे चांगली आणि गाढ झोप लागते. चांगली झोप झाली तरच सकाळी फ्रेश वाटतं.

तोंडाची दुर्गंधी होईल दूर

अनेक लोकांना तोंडाची दुर्गंधी येण्याची समस्या असते. अशात ही समस्या दूर करण्यासाठी वेलची खूप फायदेशीर ठरते. वेलचीमध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात, जे तोंडातील बॅड बॅक्टेरिया नष्ट करतात. त्यामुळे तोंडाची येणारी दुर्गंधी दूर होण्यास मदत मिळते. यासाठी रात्री झोपण्याआधी एक वेलची खा.

मेटालबॉलिज्म बूस्ट होतं

रात्री वेलची खाऊन झोपल्यानं मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यास मदत मिळते. यात मेलाटोनिन असतं, जे मेटाबॉलिज्म बूस्ट करतं. मेटाबॉलिज्म बूस्ट झालं तर वजन वेगानं कमी करण्यास मदत मिळते. त्यामुळे जे लोक वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांनी नियमितपणे वेलची खावी.

पचनक्रिया सुधारते

वेलचीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल्स असतात, जे पचनासंबंधी एंझाइम्सना बूस्ट करतात. ज्यामुळे पचनक्रिया चांगली होते. वेलचीमुळे केवळ पचनक्रिया चांगली होते असं नाही तर बद्धकोष्ठता, अॅसिडिटी आणि गॅससंबंधी समस्याही दूर होते.

स्ट्रेस कमी होतो

आजकालच्या धावपळीच्या जीवनात वाढता कामाचा ताण आणि जबाबदाऱ्यांमुळे स्ट्रेसही वाढत चालला आहे. अशात ही समस्या दूर करण्यासाठी छोटीशी वेलची फायदेशीर ठरते. यातील काही पोषक तत्व मेंदुमध्ये सेराटोनिनची लेव्हल वाढवतात. हे एक न्यूरोट्रान्समीटर असतं, जे मूड चांगला ठेवतं. ज्यामुळे स्ट्रेसही कमी होतो. स्ट्रेस कमी झाला तर शरीरही हेल्दी राहतं.

हृदयासाठी फायदेशीर

वेलचीमध्ये मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअमसारखे मिनरल्स असतात, जे ब्लड प्रेशर कंट्रोल करतात. ज्यामुळे हृदय निरोगी राहतं. जर हृदय निरोगी राहिलं तर शरीरातील अवयव सुद्धा निरोगी राहतात.

वेलचीचे अनेक फायदे असले तरी याचा अर्थ असा नाही की, वेलची खूप जास्त प्रमाणात खावी. कारण कोणत्याही गोष्टीची अति जशी घातक असते, तेच वेलचीला सुद्धा लागू पडतं. वेलची कमी प्रमाणात खावी. खूप जास्त खाल तर आरोग्यावर वाईट प्रभावही पडू शकतो.

 

(सोशल मीडियावरून साभार)

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

14 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago