आरोग्य

पावसाळ्यात दही खावं की नाही

पावसाला काही भागांमध्ये नुकतीच सुरूवात झाली आहे. त्यामुळे अनेकांना असह्य उकाड्यातून थोडातरी दिलासा मिळाला आहे. पावसाळा आला की, सोबत काही आजारांनाही घेऊन येतो. त्यामुळे दिवसांमध्ये आरोग्याची खूप काळजी घेतली पाहिजे. सामान्यपणे उन्हाळ्यात भरपूर लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दह्याचं भरपूर सेवन करतात. पण आता पावसाळ्यात दही खावं की नाही, असा प्रश्न काही लोकांना पडतो.

वातावरण बदलताच आपल्याला आहारातही बदल करायला हवा. असं केलं नाही तर त्या आहाराचे गुण बदलतात आणि त्यांचे फायदे होण्याऐवजी नुकसान अधिक होतात. आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे की, पावसाळ्यात पोटातील पचन अग्नि कमजोर होते. अशात आहारात बदल करणं गरजेचं असतं. जे आपल्या शरीराला उष्णता देतील आणि पचनक्रियेत मदत करतील असेच पदार्थ खायला हवेत.

पावसाळ्यात दही खावं की नाही

पावसाळ्यात दही खाणं टाळलं पाहिजे. या दिवसांमध्ये दही खाल्लं तर कफ तयार होतो, ज्यामुळे खोकला आणि सर्दी होते. सोबतच पचनक्रियाही योग्यप्रकारे होत नाही. पावसाळ्यात या पदार्थांचं सेवन केलं तर घसा खराब होतो, पोटात गडबड होते आणि तापही येऊ शकतो. डॉक्टर म्हणाले की, जर तुम्हाला या दिवसात दही खायचंय असेल तर त्यात. साखर टाकून खावे. तसेच रात्री दही अजिबात खाऊ नये. असं केल्याने पोटासंबंधी समस्या होऊ शकतात.

पावसाळ्यात काय खाव

पावसाळ्यात शरीराचं तापमान योग्य ठेवण्यासाठी आलं, सुंठ, हींग, काळे मिरे आणि गव्हाच्या चपात्या यांचं सेवन करावं. पावसाळ्यात शरीरातील दोष दूर करण्यासाठी चटकदार आणि गोड पदार्थ खावेत.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

15 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago