आरोग्य

खुर्चीत तासंतास बसून काम करता, पाठ – मान दुखते, ५ मिनिटात ४ व्यायाम करा, स्नायू होतील मोकळे

ऑफिसमध्ये असताना आपण किमान ८ ते ९ तास खुर्चीतच बसून असतो. खुर्चीत बसून कामाला सुरुवात केल्यावर आपण जागचे फारसे हलत नाही. तासंतास आपण त्याच खुर्चीत बसून घालवतो. ब्रेक न घेता सतत असेच खुर्चीत बसून राहिल्याने आपली पाठ, कंबर, पाय आखडून जातात. यामुळे तर अनेक जणांच्या शरीराची ठेवण किंवा बसण्याची, उभे राहण्याची ठेवणही बदलली आहे. बैठ्या जीवनशैलीमुळे दिवसातील १२ ते १४ तास आपण वेगवेगळ्या स्थितीत बसलेले असतो. कधी खुर्चीवर, कधी गाडीवर, कधी सोफ्यावर. या स्थितीत पोटापासून मांडीकडे जाणारे स्नायू हे आकुंचित झालेले असतात. सतत खुर्चीवर बसून कंटाळा आल्यास एक छोटा ब्रेक घेऊन खुर्चीवर बसल्या बसल्या करता येण्यासारखे व्यायाम प्रकार समजून घेऊयात. ब्रेक घेतल्यानंतर त्या वेळेचा सदुपयोग करा आणि हे व्यायाम प्रकार करून पाहा

नक्की कोणते व्यायाम प्रकार करता येऊ शकतात…

1) चेअर स्क्वाट्स

1) चेअर स्क्वाट्स करण्यासाठी सर्वप्रथम सरळ ताठ उभे राहा. चेअर आपल्या पाठीमागे ठेवा.

2) आता आपले दोन्ही हात अलगद मागे नेऊन चेअरच्या दोन्ही कोपऱ्यांवर ठेवा.

3) पाय गुढघ्यात दुमडून मग मागच्या हातांवर आणि पायांवर जोर देऊन अर्धवट खाली बसा.

4) याच स्थितीत खाली वर उठ – बस करा.

2) चेअर स्पायनल ट्विस्ट

1) दोन्ही पाय खुर्चीच्या डाव्या बाजूला करा. दोन्ही हात मागे करून त्याने खुर्चीची मागची बाजू पकडा.

2) चेहरा आणि संपूर्ण शरीर उजव्या बाजूला करा. दिर्घ श्वास घेऊन ही अवस्था २० ते ३० सेकंद टिकविण्याचा प्रयत्न करा.

3) यानंतर आता दोन्ही पाय खुर्चीच्या उजव्या बाजूला तर चेहरा आणि शरीर डाव्या बाजूला करा

4) आधीची पोझिशन जेवढ्या वेळ टिकवली तेवढाच वेळ ही आसनअवस्था टिकविण्याचा प्रयत्न करा.

3) चेअर पुशअप्स

1) चेअर पुशअप्स करण्यासाठी सर्वप्रथम सरळ ताठ उभे राहा. चेअर आपल्या डोळ्यांसमोर ठेवा.

2) आता आपल्या दोन्ही हातांनी खुर्चीचे आपल्यासमोरील दोन्ही कोपरे धरा.

3) मग पाय लांब करत पाठ सरळ रेषेत ठेवत पोटाच्या कोर भागावर जोर द्या.

4) त्यानंतर गुढघ्यांना हलकेच दुमडून, हातसुद्धा कोपऱ्यात दुमडून घेत हळुहळु खुर्चीवर पुढच्या बाजूस झुका.

5) आता परत आपल्या हातांच्या दुमडलेल्या कोपऱ्यांना सरळ करत खुर्ची पासून वर या.

6) असे किमान १० ते १५ वेळा करा.

4) चेअर वीरभद्रासन

1) उजवा पाय खुर्चीच्या थोडा बाहेर काढून उजव्या दिशेला फिरवा.

2) डावा पाय डाव्या बाजूला बाहेर काढा आणि तो गुडघ्यातून वाकणार नाही, याची काळजी घ्या.

3) आता दोन्ही हात खांद्याला समांतर पसरवा. चेहरा उजव्या हाताकडे वळवा तसेच छाती, पोट हे देखील उजव्या हाताकडे वळवा.

4) ही आसनस्थिती काही सेकंद टिकविण्याचा प्रयत्न करा. आता हेच आसन दुसऱ्या बाजूने करावे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

11 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

11 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

11 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

11 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

11 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

15 तास ago