महाराष्ट्र

अण्णाभाऊ साठे जयंतीकडे सांस्कृतिक विभागाची पाठ?; विशेष कार्यक्रम नसल्याने कलाक्षेत्रात नाराजी

मुंबई: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून बळ देणारे, वंचित-शोषितांच्या वेदनांना शब्द देणारे लोकशाहिर तथा ज्येष्ठ साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन करण्यात आले. मात्र, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून त्यांच्या जयंतीनिमित्त कोणताही विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला नसल्याने साहित्य, लोककला आणि सांस्कृतिक क्षेत्रात नाराजी व्यक्त होत आहे.

अण्णाभाऊ साठे यांचे मराठी साहित्य, लोकशाहीर परंपरा आणि सामाजिक परिवर्तनातील योगदान मोठे मानले जाते. त्यांच्या साहित्याने उपेक्षित, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या आयुष्याला शब्द दिले. त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय व्याख्यानमाला, शाहिरी कार्यक्रम, लोककला सादरीकरण किंवा अभिवादनपर सांस्कृतिक उपक्रम आयोजित होण्याची अपेक्षा होती.

मात्र, सांस्कृतिक कार्य संचालनालय किंवा पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने कोणताही विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेक साहित्यिक, लोककलावंत आणि सांस्कृतिक क्षेत्रातील जाणकारांनी याबाबत खंत व्यक्त केली आहे.

राज्य सरकार लोककला आणि लोककलावंतांच्या संवर्धनाचा पुरस्कार करत असताना, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या साहित्याचा आणि विचारांचा जागर करण्यासाठी अधिक संवेदनशील भूमिका घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

अण्णाभाऊ साठे यांचे कार्य केवळ साहित्यापुरते मर्यादित नसून सामाजिक परिवर्तनाशी जोडलेले आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, लोककलांना चालना मिळावी आणि त्यांच्या स्मृती जपण्यासाठी शासनाने नियमित सांस्कृतिक उपक्रम राबवावेत, अशी मागणी सांस्कृतिक क्षेत्रातून करण्यात येत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

2 तास ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

2 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

6 तास ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

6 तास ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

6 तास ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

7 तास ago