महाराष्ट्र

जनतेच्या विश्वासाचा सन्मान करत महायुती सरकार स्थापन; विकासालाच प्राधान्य; दिनेश शिंदे

२०१९ च्या जनादेशाचा सन्मान, २०२२ मधील राजकीय बदल आणि विकासाभिमुख प्रशासनावर भर

मुंबई: २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने शिवसेना-भाजप युतीवर विश्वास ठेवत विकास आणि स्थैर्याच्या बाजूने कौल दिला होता. मात्र, निवडणुकीनंतर झालेल्या राजकीय घडामोडींमुळे जनतेच्या अपेक्षा आणि प्रत्यक्ष सत्तासमीकरण यामध्ये तफावत निर्माण झाली, असे मत शिवसेना पक्षाचे राष्ट्रीय सह समन्वयक व प्रसार माध्यम समन्वयक दिनेश शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

शिंदे यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जनतेच्या कौलाचा सन्मान व्हावा या भावनेतून २०२२ मध्ये शिवसेनेतील आमदारांनी वेगळी भूमिका घेत भारतीय जनता पक्षाच्या सहकार्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारची स्थापना केली.

हे सरकार केवळ सत्ताबदल नसून जनतेच्या अपेक्षांनुसार विकासाला गती देण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले. पायाभूत सुविधा, उद्योगवाढ, रोजगारनिर्मिती आणि सामान्य नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील असल्याचा दावाही त्यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लोकाभिमुख प्रशासन, विकासकामांना गती आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यात आल्याचे सांगत, महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी जनतेचा विश्वास आणि विकासाचा ध्यास हेच महायुतीचे प्रमुख ध्येय असल्याचे दिनेश शिंदे यांनी स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

20 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

20 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

20 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

20 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

20 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

20 तास ago