महाराष्ट्र

आधी तरुणांची माफी मागा, मग संवाद साधा; मोहन भागवतांवर काँग्रेसचा निशाणा

मुंबई: पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील बदलांच्या मागणीसाठी झालेल्या देशव्यापी आंदोलनावरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी, आंदोलन करणाऱ्या तरुणांवर झालेल्या कथित कारवाईबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी केली.

मुंबईतील टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना लोंढे म्हणाले की, दिल्लीतील जंतरमंतरसह देशभरात लाखो तरुणांनी शांततापूर्ण आंदोलन केले. मात्र, आंदोलन दडपण्यासाठी लाठीहल्ला, पेलेट गनचा वापर आणि आंदोलकांशी गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. आंदोलनकर्त्यांना देशद्रोही आणि पाकिस्तानधार्जीणे ठरवून बदनाम करण्याचाही प्रयत्न झाल्याचे त्यांनी म्हटले.

मोहन भागवत तरुणांशी संवाद साधत असताना, आधी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित कारवाईबद्दल मोदी-शाह यांनी माफी मागावी, अशी भूमिका लोंढे यांनी मांडली. “अन्यथा हा संवाद ढोंगीपणाचाच भाग ठरेल आणि तरुणाई त्यावर विश्वास ठेवणार नाही,” असा दावा त्यांनी केला.दरम्यान, पेलेट गन वापरण्याचा आदेश कोणी दिला, याची चौकशी करून केंद्र सरकारने संसदेत याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा विराट जनआक्रोश मोर्चा; भाजप सरकारवर घणाघाती हल्लाबोल

महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, लाडकी बहीण योजना आणि स्मार्ट मीटरवरून सरकारवर टीका; तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन…

43 मिनिटे ago

व्यायाम व योगा करण्याचे फायदे

1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे…

4 तास ago

चयापचय बिघडण्याची कारणे

झोप पूर्ण न होणे आणि शांत झोप न लागणे यामुळे इन्सुलिन आणि कोर्टिसोल सारख्या हार्मोन्सचे…

4 तास ago

छत्रपती संभाजीनगरच्या विकास प्रकल्पांना गती; भूसंपादनासाठी ३० खासगी भूमापकांची नियुक्ती

ऑरिक, ग्रीनफील्ड रस्ता, विमानतळ विस्तार आणि रेल्वे दुहेरीकरणाच्या कामांना मिळणार वेग; नागरिकांच्या जमीन मोजणीची प्रतीक्षाही…

4 तास ago

‘गुंगी गुडिया’ वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा आक्रमक; मुंबईत काँग्रेसविरोधात मूक आंदोलन.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याविरोधात काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर…

5 तास ago

NEET आंदोलनावरील कारवाईच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे मुंबईत बॅनर आंदोलन; अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई: NEET पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस कारवाईच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसने वांद्रे…

5 तास ago