महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भाषा हर्षवर्धन सपकाळांवर हल्ला करण्यासाठी चिथावणी देणारी; अतुल लोंढे

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी औरंगजेबाच्या कारभाराची व देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराची तुलना केली पण त्याचा विपर्यास करून सपकाळ यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ कापली काय, डोळे फोडले, काय अशी चिखवणीखोर विधाने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहेत, हे अत्यंत आक्षेपार्ह असून हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर हल्ला व्हावा, अशी भडकाऊ विधाने शिंदे करत आहेत, असे प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलाताना अतुल लोंढे म्हणाले की, हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी, प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला त्यावेळी साधा निषेध तरी केला का? सातत्याने धार्मिक तेढ निर्माण करणारे, भडकाऊ भाषा वापरणाऱ्या मंत्री नितेश राणेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची धमक एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मागच्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते असे विधान करून छत्रपतींचा अपमान करणाऱ्या भाजपा खासदाराचा निषेध करण्याची धमक शिंदे यांच्यात आहे का? असा सवाल लोंढे यांनी केला आहे.

नागपूर दंगलीवर बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, नागपूर शहर हे शांतताप्रिय शहर आहे. हिंदू मुस्लीम दोघेही आजपर्यंत शांततेने रहात आहेत. राम नवमीला दोन्ही समाजाचे लोक उत्साहाने सहभागी होतात. तर ताजुद्दीनबाबाच्या उरुसामध्येही हिंदू मुस्लीम एकोप्याने सहभागी होतात, अशा शहरात धार्मिक दंगल होतेच कशी, सरकारला याची काहीच कल्पना नव्हती का, हे सरकारचे अपयश आहे. पोलिस इंटेलिजन्स काय करत होते आणि पोलिसांवरच हल्ले होत असतील तर गृहमंत्री पदावर फडणीस रहातात कसे, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे.

मध्य नागपूरमध्ये ही घटना झाली असून याच भागात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे घर आहे. स्थानिक भाजपा आमदार प्रविण दटके पोलिसांना दोष देत असतील तर त्याची चौकशी करून कारवाई झाली पाहिजे पण दंगलीचा फायदा कोणाला होतो हे सर्वांना माहित आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, शेतकरी आत्महत्या करत आहेत, महिला अत्याचारांच्या घटना सातत्याने होत आहेत, शेतमालाला भाव नाही, तरुणांना नोकऱ्या नाहीत, बेरोजगारी व महागाई वाढली आहे या मुळ प्रश्नांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हा प्रयत्न आहे असेही लोंढे म्हणाले. नागपुरकारांनी अफवांना बळी न पडता शांतता राखावी असे आवाहनही अतुल लोंढे यांनी केले आहे. विधिमंडळात पत्रकारांना पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीचा काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी यावेळी निषेध केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

11 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

17 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

17 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

18 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

18 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

18 तास ago