मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे उपचारासाठी ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार फोडून शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. सध्या ते गुवाहाटीला आमदारांसोबत आहेत. राज्यपाल यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे. पण, राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्यामुळे भेट होणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याने राज्यातील शिवसेने विरोधातील आणखी तीन दिवस बंड कायम राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याने आता गोव्याचे राज्यपाल यांच्याकडे महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल म्हणून नियक्ती होणार आहे. राज्यपाल कोश्यारी हे एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल झाल्याने एकनाथ शिंदे यांची भेट आता गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी होणार आहे.
दरम्यान, शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवले असून, त्यांच्या जागी अजय चौधरी यांची निवड केली आहे. पण सेनेकडे फक्त १७ आमदार असल्याचे पत्र दिले होते. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त आमदार आहेत.
शिरुर (तेजस फडके) पुणे-अहिल्यानगर महामार्गावर न्हावरे फाटा येथे मध्यरात्री धावणाऱ्या एसटी बसला एका काळ्या रंगाच्या,…
मुंबई: राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठाकरे गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.…
नागपूर: राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक…
मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…