महाराष्ट्र

लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापूर्वी ₹1500; ₹3000 च्या चर्चेला पूर्णविराम

मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जुलै महिन्याच्या सन्मान निधीच्या वितरणाची तांत्रिक प्रक्रिया राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली असून, पात्र महिलांच्या आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यात ₹1500 जमा होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे मिळून ₹3000 एकाचवेळी खात्यात जमा होणार, अशी चर्चा सुरू होती. मात्र, सध्या सरकारकडून केवळ जुलै महिन्याचा ₹1500 हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप जमा करण्यात आलेला नाही.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जुलै महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात ₹1500 जमा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, लाभार्थी महिलांनी आपल्या बँक खात्याला आधार लिंक आहे का, खात्यात रक्कम जमा झाली आहे का आणि बँकेकडून SMS आला आहे का, याची तपासणी करावी. बँक अॅप, एटीएम किंवा बँक शाखेच्या माध्यमातूनही खात्यातील शिल्लक तपासता येणार आहे.त्यामुळे ₹3000 मिळणार असल्याच्या चर्चेऐवजी सध्या जुलै महिन्याच्या ₹1500 हप्त्यावरच लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

10 तास ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

11 तास ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

11 तास ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

11 तास ago

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क; सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांना मतदानाचे आवाहन

बारामती: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा…

11 तास ago

शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरीला; गुन्हा दाखल…

न्हावरे (तेजस फडके): इनामगाव (ता.शिरुर) येथे शेतजमिनीतून दोन विद्युत मोटारी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली…

16 तास ago