महाराष्ट्र

7 वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून अत्याचार…

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीत शिक्षण घेणाऱ्या ७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शाळेतील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या गंभीर प्रकरणाची तक्रार दडपण्यासाठी धमकी दिल्याच्या आरोपावरून पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. मुख्य आरोपी शिक्षक अद्याप फरार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या सात वर्षांची मुलगी गेल्या महिनाभरापासून शाळेच्या सुट्टीत एकटी असल्याचा फायदा घेत शिक्षकाने तिच्यावर वेळोवेळी अश्लील वर्तन करत गंभीर स्वरूपाचे लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलगी आरडाओरडा करू लागल्यावर शिक्षकाने तिच्यावर मारहाणही केल्याचे समोर आलंय.

पीडित मुलीच्या पालकांनी गावातील आदिनाथ रामनाथ दराडे,राजेंद्र सूर्यभान दराडे, मुनवरखान सर्वरखान पठाण, उमर नियाज पठाण यांना ही बाब सांगितली. त्यानंतर त्यांनी तक्रार न करण्यासाठी दबाव आणला. तक्रार केल्यास गावात राहू देणार नसल्याची धमकी दिली. त्यांनी पीडितेच्या कुटुंबाला गप्प बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रकरण बाहेर आल्यानंतर पाथर्डी पोलिसांनी चौघांना अटक केली

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पुजारी, उपनिरीक्षक विलास जाधव तसेच पोहेकॉ. संदीप ठाकणे, नितीन दराडे, बाबासाहेब बडे, इजाज सय्यद, अक्षय वडते आणि अमोल जवरे यांच्या पथकाने चौघांवर कारवाई केली. या घटनेचा पर्दाफाश करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड आणि अ‍ॅड. हरिहर गर्जे पुढे आले. या सामाजिक कार्यकर्त्यांना हेरंब कुलकर्णी, स्नेहालयाचे गिरीश कुलकर्णी यांची मदत मिळाली. तसेच उडान संस्थेच्या पूजा दहातोंडे व शाहीन शेख यांनीही मदत केली.

पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी पाथर्डीमधील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली आहे. रुग्णालयातून वैद्यकीय अहवाल प्राप्त होणार आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शिक्षक सध्या फरार आहे. त्याच्या अटकेसाठी पथक शोधकार्य करत आहे. या प्रकरणात शिक्षकाला फाशीची शिक्षा व्हावी आणि खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडित कुटुंबाला तात्काळ न्याय मिळावा, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कोंढापुरीत तरुणावर चाकूने वार करत खून; शिक्रापुर पोलिसांनी १२ तासांत आरोपीच्या आवळल्या मुसक्या

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील कोंढापुरी येथे आज बुधवार (दि २१) रोजी सकाळी सातच्या सुमारास…

6 तास ago

घोड धरणातील वाळूमाफियां विरोधात वडगाव-शिंदोडी ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव; तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

श्रीगोंदा (विशेष प्रतिनिधी) घोड धरणाच्या बॅकवॉटरमध्ये गेल्या पाच वर्षांपासून रात्रंदिवस बेकायदशीर वाळू उपसा सुरु असून,…

12 तास ago

शिरुर पोलिस ऍक्शन मोडवर ‘राजहंस लॉज’ वर छापा टाकत अनधिकृत ‘वेश्या’ व्यवसाय प्रकरणी एका पत्रकारासह दोघांना अटक

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथील राजहंस लॉजमध्ये महिलेकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची…

13 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित शिवसेनेचा दसरा मेळावा; मदतीसाठी राज्यव्यापी कार्यक्रमाची घोषणा होणार

मुंबई: राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने यंदाचा दसरा मेळावा संकटग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित केला आहे. गोरेगाव येथील…

2 दिवस ago

दुष्काळग्रस्त गावांसाठी स्वतंत्र सूक्ष्म कृती आराखडे तयार करा

धाराशिव जिल्ह्यातील पाणी, चारा टंचाईवर उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचे डॉ. राजेश देशमुख यांचे निर्देश धाराशिव: जिल्ह्यातील…

2 दिवस ago

टायगर श्रॉफच्या भेटीसाठी एकनाथ शिंदे वांद्र्यात; कलाकारांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे निर्देश

मुंबई: बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर आज संध्याकाळी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना घडली. या…

2 दिवस ago