महाराष्ट्र

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल; नेमकं कारण काय

मुंबई: सरकारी कामात अडथळा आणल्यामुळं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मुंबईतील मरिन ड्राइव्ह पोलिसांनी  गुन्हा दाखल केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची परवानगी घेऊन गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना काल पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. देशमुख यांना विधानभवना बाहेर घेऊन जात असतानाच आव्हाड आक्रमक झाले. त्यांनी थेट पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

विधानभवनाच्या लॉबीत काल आव्हाड आणि पडळकर यांच्या कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी झाली होती. आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांचा शर्ट फाटेपर्यंत मारहाण झाली होती. विधानसभेच्या सुरक्षारक्षकांनी हस्तक्षेप केल्यानंतर वाद जास्त वाढला नाही. या सगळ्या प्रकरणावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. आता विधानसभेतही आमदार सुरक्षित नाहीत अशी टीका आमदार आव्हाड यांनी केली होती.

यानंतर नितीन देशमुख यांना विधानभवन परिसरातून ताब्यात घेऊन मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात नेले जात होते. त्यावेळी जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले. त्यांनी थेट पोलिसांच्या जीपसमोर झोपून विरोध केला होता. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पोलिसांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या या कारवाईवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल होणं ही सत्तेची मस्ती आहे. मकोकाचा आरोपी असणाऱ्याला विधानभवनात कसा प्रवेश मिळतो. सीसीटीव्हीत दिसत आहे की पडळकरांनी इशारा करून नितीन देशमुखांना मारण्यास सांगितलं असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

आव्हाड यांच्यावर हल्ला करायचा होता. यासाठीच विधानभवनाच्या आवारात गुंड आणले होते. आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर हे राज्य कायद्याचं राज्य राहिलेलं नाही. सरकारच्या मर्जीनुसार चालणारं राज्य झालं आहे. सरकारच्या विरोधात जो कुणी आवाज उठविल त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला संपवून टाकू ही तर सत्तेची मस्ती आहे अशी घणाघाती टीका वडेट्टीवार यांनी केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाराष्ट्र–ऑस्ट्रेलिया जैवउत्पादन भागीदारीला मिळणार नवी गती

‘बायोमॅन्युफॅक्चरिंग टास्क फोर्स’ स्थापन करण्याचा प्रस्ताव; तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीवर भर मुंबई: जैवतंत्रज्ञान, संशोधन, व्यापार आणि…

5 तास ago

भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…

18 तास ago

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…

18 तास ago

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…

19 तास ago

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

21 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

23 तास ago