एका दाखल्यासाठी विद्यार्थ्यांना मोजावे लागतात ३ ते ४ हजार रुपये आमदार अस्लम शेख यांचा आरोप
मुंबई: बोरीवली तहसिल कार्यालयातील आपले सरकार केंद्र दिड महिना बंद राहणार आहे, अशी माहिती आपल्याला मिळाली असून हे केंद्र जर एवढ्या कालावधीसाठी बंद राहिलं तर गोरगरीब विद्यार्थ्यांनी जायचं कुठे असा सवाल विचारत हे आपले सरकार सेवा केंद्र तातडीने सुरु करावे, अशी मागणी आमदार अस्लम शेख यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत केली.
शेख म्हणाले, बोरीवली तालुक्याच्या तहसिल कार्यालयातील आपले सरकार सेवा केंद्र दिड महिना बंद राहणार अशी माहिती मला प्राप्त झाली आहे.
आपले सरकार सेवा केंद्राच्या बाहेर VLE केंद्रांची यादी लावण्यात आली आहे. पण या केंद्रावर दाखले काढून देण्यासाठी भरमसाठ रक्कम आकारण्यात येते, अशा तक्रारी मला प्राप्त होत आहेत.जे दाखले तहसिल कार्यालयाच्या आपले सरकार केंद्रांवर ₹३४ एवढ्या कमी किमतीत मिळतात त्या दाखल्यांसाठी ३००० ते ४००० रुपये विद्यार्थ्यांकडून आकारले जात आहेत.
जुन व जुलै हा शैक्षणिक प्रवेशांचा कालावधी असतो. विद्यार्थांना फार मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक दाखले लागत असतात. मग अचानक आपले सरकार सेवा केंद्र का बंद करण्यात आले? गोरगरीब विद्यार्थ्यांनी जायचं कुठे…
सर्व काही व्यवस्थित चालू असताना ऐन शैक्षणिक प्रवेशाच्या कालावधीत निवदा प्रक्रिया राबवून नव्या कंपनीला आपले सरकार सेवा केंद्राचे काम दिल्यामुळे हे सर्व घडतय. विद्यार्थ्यांचे भविष्य दाखले न मिळाल्याने उद्ध्वस्त होईल. त्यांचे प्रवेश नाकारले जातील अशी भिती व्यक्त करत, बोरीवली तहसिल कार्यालयातील आपले सरकार सेवा केंद्र तातडीने सुरु करण्याची मागणी आमदार शेख यांनी केली.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…