महाराष्ट्र

विलेपार्ले येथे उत्तुंग महाखादी प्रदर्शनचे आयोजन

मुंबई: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने ग्रामीण कारागीर व उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना शहरी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विलेपार्ले येथे “उत्तुंग महाखादी प्रदर्शन” आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. १८ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत महालक्ष्मी नारायण हॉल लॉन्स, सुभाष रोड, विलेपार्ले (पूर्व) येथे होणार असून, दररोज सकाळी १०.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत नागरिकांना भेट देता येणार आहे, अशी माहिती मंडळाचे सभापती रवींद्र साठे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बावीस्कर यांनी आज पत्रकार परिषदेतून दिली.

या प्रदर्शनात खादी वस्त्र, खादी साड्या, शुद्ध सेंद्रिय “मधुबन” मध, हळद, मसाले, कोल्हापूरी चप्पल, गूळ तसेच इतर ग्रामोद्योगी उत्पादने यांसारख्या वस्तूंचे ५० स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. खादीच्या स्वदेशी वस्त्रांबरोबरच आरोग्यासाठी लाभदायक सेंद्रिय उत्पादने आणि ग्रामीण भागातील कारागिरांच्या हातांनी साकारलेली दर्जेदार उत्पादने ग्राहकांना उपलब्ध होतील.

ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळ गेल्या ६५ वर्षांपासून अविरतपणे कार्यरत आहे. राज्य शासनाच्या उद्योग विभागांतर्गत खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या विविध योजना राबवल्या जातात. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मधकेंद्र (मधमाशापालन), मधाचे गाव तसेच प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना अशा अनेक उपक्रमांद्वारे ग्रामीण कारागीर आणि उद्योजकांना आर्थिक मदत आणि व्यवसायवृद्धीसाठी संधी दिली जाते.

ग्रामीण संस्कृती आणि पारंपरिक उत्पादने अनुभवण्याची तसेच स्वदेशी खादी आणि ग्रामोद्योगी वस्तूंची खरेदी करण्याची सुवर्णसंधी या प्रदर्शनात मिळणार आहे. या प्रदर्शनास अधिकाधिक मुंबईकर नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग सभापती श्री.साठे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती बाविस्कार यांनी मंडळाच्या वतीने केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

इम्यूनिटी बुस्ट करण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींपासून तयार करा काढा

पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…

6 तास ago

रोज रात्री पायाला तेलानं मालिश करा, तब्येत कायमची सुधरवून टाकणारा पाहा सोपा उपाय

तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा…

6 तास ago

लहान मुलांसह त्यांच्या आईबाबांचाही ब्रेन रॉट नावाचा आजार कसा ओळखाल

खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण त्यांच्या…

6 तास ago

४० कोटींच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणात अरविंद पाटील निलंगेकरांना दिलासा नाही

दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला नाशिक: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या…

6 तास ago

शिक्षकांच्या प्रश्नांना सरकारचे प्राधान्य; सरनाईक यांच्या विजयासाठी शिंदेंचे आवाहन

अमरावती: शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने…

6 तास ago

संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे संघर्ष करावा; विजय वडेट्टीवार

अमरावती: देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधान आणि बहुजन समाजाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे…

7 तास ago