महाराष्ट्र

ठाणे महापालिकेचा घनकचरा प्रकल्प राज्यासाठी पथदर्शी ठरेल…

ठाणे: मौजे भाईंदरपाडा (गायमुख) येथील ठाणे महापालिकेच्या जागेवर विकसित होत असलेल्या एरोबिक्स स्वयंचलित बायो कंपोस्टींग मशीन द्वारे ओल्या कचऱ्यापासून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प राज्यात पथदर्शी ठरेल असे प्रतिपादन परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी केले. ते ठाणे महापालिका हद्दीतील विकास कामांच्या पाहाणी दौऱ्याच्या प्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांच्या बरोबर महापालिका आयुक्त सौरभ राव व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मौजे भाईंदरपाडा येथे ठाणे महापालिकेची सुमारे ४१९० चौ.मी. क्षेत्र घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. सध्या या जागेतील १/३ जागेवर ९०-१०० टनांपर्यंत प्राप्त झालेल्या ओल्या कचऱ्यापासून पासून एरोबिक्स स्वयंचलित बायो कंपोस्टींग मशीन द्वारे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कंपोस्ट खतांची निर्मिती प्रकल्प सुरू आहे. उर्वरित जागेवर हा प्रकल्प विस्तारित करण्यात येणार असून सुमारे ३०० टनांपर्यंतचा घनकचरा प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेने लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिले. Lahs Green India Pvt Ltd. SOLARISED CONTROL WINDROW COMPOSTING (IIT PAWAI,MUMBAI PATENTED) technology द्वारे अशा प्रकारे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प राबविणारी ठाणे महापालिका देशातील पहिलीच महापालिका ठरणार आहे. या जोडीला Enviro Invent System Pvt. Ltd या कंपनीने बनविलेले Treatment Of The Waste On The Go(TOWGO vehicle) वाहनाद्वारे जागेवर एकावेळी सुमारे २ टन ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करण्यात येते, अशी लवकर अजुन २० वाहने उपलब्ध होत आहेत.

या पाहणी दौऱ्यात मंत्री सरनाईक यांनी स्वराज्याचे पहिले आरमार प्रमुख श्री.कान्होजी आंग्रे यांचे यथोचित स्मारक विकसित होत असलेल्या नांगला बंदराची देखील पहाणी केली. यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले, ” प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या प्रत्येक आगरी- कोळी कुटुंबांचे सन्मानपूर्वक पुनर्वसन करण्यात यावे !” असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी महापालिका क्षेत्रातील विकास कामांला अडथळा ठरणाऱ्या अन्य जागेवरील अतिक्रमण निर्मूलन तातडीने करुन घ्यावे अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

14 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

14 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

14 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

14 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

14 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

18 तास ago