शेतकऱ्यांना भिकारी म्हणणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्या; अतुल लोंढे
मुंबई: भाजपा युती सरकारमधील मंत्र्यांचा शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन चांगला नाही. शेतकऱ्यांना भिकारी म्हणून अपमान करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदावर बसण्याचा अधिकार नाही. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा घेऊन घरी पाठवावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
“हल्ली भिकारीही एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांत पीकविमा दिला”, या कृषीमंत्री माणिकराव कोकोटे यांच्या वक्तव्यावर अतुल लोंढे यांनी तीव्र आक्षेप घेत माणिकराव कोकाटे व भाजपा युती सरकारवर तोफ डागली. शेतकरी अन्नदाता आहे, देशाचा मालक आहे, तो घाम गाळून पिकवतो म्हणून आपल्या ताटात अन्न येते, स्वतः उपाशी राहून तो लोकांचे पोट भरतो त्या शेतकऱ्यांना भिकारी म्हणण्याची हिम्मत कशी होते? पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झाला आहे पण भ्रष्टाचार होतच असतात असेही कृषी मंत्री कोकाटे म्हणत आहेत. सरकारमधील लोकांना काही लाजलज्जा आहे का? कसले लोक मंत्रिमंडळात घेतले आहेत? असा सावल विचारत अजित पवार यांनी या प्रकरणी लक्ष घालावे असे अतुल लोंढे म्हणाले.
पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…
तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा…
खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण त्यांच्या…
दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला नाशिक: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या…
अमरावती: शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने…
अमरावती: देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधान आणि बहुजन समाजाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे…