मुंबई: भारतीय संगीत क्षेत्राला अजरामर करणाऱ्या स्वरसम्राज्ञी, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असल्याची भावना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी व्यक्त केली.
आपल्या शोकसंदेशात मंत्री भोंसले म्हणाले की, आशा भोसले यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि जादुई गायनशैलीने अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. विविध भाषांमधील हजारो गाण्यांच्या माध्यमातून त्यांनी भारतीय संगीतसृष्टी समृद्ध केली. त्यांच्या आवाजातील माधुर्य, लयबद्धता आणि भावपूर्ण अभिव्यक्तीमुळे भारतीय संगीताला जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळाली.त्यांनी पुढे नमूद केले की, आशा भोसले यांच्या निधनामुळे भारतीय संगीतविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून ही हानी कधीही भरून न निघणारी आहे.
आशाताई भोसले यांनी आपल्या विलक्षण प्रतिभेच्या जोरावर पद्मविभूषण, ग्रॅमी, दादासाहेब फाळके पुरस्कार, महाराष्ट्र भूषण यांसारख्या अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित होऊन देशाचा गौरव वाढवला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या कला क्षेत्राचे अपूरणीय नुकसान झाले आहे. या दुःखद प्रसंगी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी आशा भोसले यांच्या कुटुंबीयांप्रती मनःपूर्वक संवेदना व्यक्त करून त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना केली.
मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…
ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…
मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…
शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…
मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…
मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…