महाराष्ट्र

छातीवर वार होऊनही रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वडिलांना वाचविण्यासाठी काढली दुचाकी

संभाजीनगर: आरोपींनी सोळा वर्षांच्या रुद्रच्या छातीवर वार केले होते. परंतु, स्वतःवर झालेल्या वारांची पर्वा न करता, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वडील प्रमोद यांना वाचविण्यासाठी त्याने घरातून चावी आणत थेट आपली दुचाकी काढली. प्रमोद मागे दुचाकीवर बसले. परंतु गंभीर वार झाल्याने त्यांचा तोल जात होता. घरातून त्यांची पत्नीही कपडा घेऊन आली. तो बांधून रुद्र निघाला. वीस फुटांवर जाताच परिसरातील एक रिक्षा मिळाली. दोघेही रुग्णालयात पोचले; परंतु गंभीर जखमी असलेले प्रमोद यांचा मृत्यू झाल्याने रुद्रला धक्का बसला.

प्लॉटच्या वादातून अख्ख्या कुटुंबावर वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. यात हल्लेखोरांनी प्रमोद पाडसवान यांच्यासह त्यांचे वडील रमेश (वय ५९) यांच्या डोक्यावर, तर मुलगा रुद्र (वय १६) याच्या छातीत आणि पायावर चाकूने वार करून जखमी केले होते. यासह प्रमोद यांची आई मंदाबाई (वय ५२) यादेखील जखमी झाल्या. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज शनिवारी समोर आले. यात आरोपींनी किती निर्दयीपणे पाडसवान कुटुंबीयांवर हल्ला केला, हे दिसून आले. दरम्यान, रुद्र हा जखमी झालेला असतानाही रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वडील प्रमोद यांना वाचविण्यासाठी धडपड करीत होता. त्याने घरातून चावी आणत दुचाकी काढून त्यावर त्यांना बसविले; परंतु वार गंभीर आणि होणारा रक्तस्त्राव यामुळे प्रमोद यांना दुचाकीवर बसणेही शक्य नव्हते. कमरेला कपडा बांधून रुद्र वडिलांना दुचाकीने रुग्णालयात नेण्यासाठी निघाला. परंतु, मध्येच एका नातेवाइकाने प्रमोद आणि रुद्र यांना आपल्या रिक्षात बसविले. तेथे पोचले, परंतु प्रमोद यांचा मृत्यू झाला.

पोलिस प्रशासन झोपेत

प्रमोद यांच्या अंत्यविधीत नातेवाईक ‘पोलिस प्रशासन झोपेत’, ‘घटनेचा निषेध’, ‘परवा तक्रार करूनही पोलिसांनी कारवाई न केल्याने एकुलता एक मुलगा गमावला’ अशा आशयाचे फलक घेऊन सहभागी झाले होते.

मुलगा गेला, प्रकृती खालावली

मुलगा प्रमोदचा हल्ल्यात मृत्यू झाल्याचे कळताच रुग्णालयात उपचार घेणारे त्यांचे वडील रमेश यांचीदेखील प्रकृती खालावली. त्यांना एकुलता एक मुलगा गेल्याने धक्का बसला. त्यांचा रक्तदाबदेखील वाढत असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. यामुळेच त्यांना अंत्यविधीसाठी येता आले नसल्याचे नातेवाइकांनी सांगितले.

अंत्यविधीसाठी रुद्र रुग्णालयातून स्मशानात

वडील प्रमोद यांच्या अंत्यसंस्कारासाठी मुलगा रुद्र याला रुग्‍णालयातून स्मशानात आणण्यात आले. येथे अंत्यविधी संपताच वडील आपल्याला सोडून गेल्याचा धक्का जखमी रुद्रला सहन झाला नाही. तेथेच त्याची प्रकृती बिघडली. यामुळे त्याला पुन्हा रुग्णालयात हलवावे लागल्याचे नातेवाइकांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

17 तास ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

17 तास ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

1 दिवस ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

1 दिवस ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

2 दिवस ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

2 दिवस ago