महाराष्ट्र

मनोज जरांगे यांच्या मोर्चावर सीएम फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण दिले जावे, या मागणीसाठी राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आता 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार आहेत. या पार्श्वभूमीवर बीडच्या मांजरसुंबा येथे मनोज जरांगे पाटील यांची रविवारी बैठक पार पडली. या बैठकीप्रसंगी भाषण करताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. येत्या 29 ऑगस्टला मुंबईत मोर्चा घेऊन जाण्यावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या मोर्चावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

राज्यभरात 27 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या काळात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) मोर्चा घेऊन आले तर मोठा जनसमुदाय मुंबईत दाखल होऊ शकतो. यामुळे यंत्रणेवर मोठा ताण निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मनोज जरांगे यांचे आंदोलन स्थगित व्हावे, यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे यांनी रविवारी मांजरसूंबा येथे सभा घेत येत्या 29 ऑगस्टला मुंबईत मोर्चा घेऊन जाण्यावर आपण ठाम असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.

मराठा समाजासाठी महायुती सरकारने केलेले काम सर्वांना माहिती आहे. मराठा समाजाला आरक्षण देणारे आमचे सरकार आहे. मागच्या काळात मी मुख्यमंत्री असताना, त्यानंतर शिवसेनेचे मुख्य नेता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना, मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले आहे. ते आरक्षण सुरु आहे. आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दीड लाख मराठा उद्योजक तयार केले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र सरकारने मराठा समाजासाठी खूप मोठ्या प्रमाणात काम केले आहे. पुढेही आम्ही काम करणार आहोत. त्यामुळे या संदर्भात कुणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही. पण लोकशाही मार्गाने कुणी आंदोलन करत असेल तर त्यांच्याही मागण्या समजून घेऊ, अशी भूमिका सीएम फडणवीस यांनी मांडली आहे.

महायुती सरकारच्या काळात मराठा समाजासाठी शिक्षणाची व्यवस्था केली आहे. मराठा समाजाच्या मुलांना राहण्यासाठी आपण त्यांना भत्ता देण्याची योजना सुरु केली आहे. आपण वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये मराठा समाज जास्तीत जास्त आला पाहिजे, यासाठी सारथी सारख्या संस्थेसोबत आपण काम केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अनेक आयएएस अधिकारी सारथीच्या माध्यमातून तयार केले आहेत. सारथीच्या माध्यमातून अनेक एमपीएससीचे विद्यार्थी तयार केले आहेत,’ असा दावा सीएम फडणवीस यांनी केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

3 तास ago

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

16 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

17 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

17 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

17 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

22 तास ago