महाराष्ट्र

पुणे जिल्ह्यात रेबीजचा बळी! पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्याने उच्चशिक्षित युवकाचा मृत्यू

दौंड: खामगाव (ता. दौंड) येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे झालेल्या रेबीज आजाराने एका उच्चशिक्षित युवकाला आपला जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. गाडीमोडी परिसरातील रहिवासी महेश राजेंद्र नागवडे (वय ३०) असे मृत युवकाचे नाव आहे.

महेश नागवडे हे दहिटणे येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लेखापाल म्हणून कार्यरत होते. मितभाषी, संयमी आणि हसतमुख स्वभावाच्या महेशच्या अकाली निधनाने खामगाव परिसरात शोककळा पसरली आहे.गुरुवारी (ता. ५) सकाळी ८ वाजता शोकाकुल वातावरणात खामगाव स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबीय व नातेवाईकांचा आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता.

कुत्र्याच्या चाव्यानंतर उपचार पूर्ण, तरीही रेबीजचा धोका

प्राप्त माहितीनुसार, ६ नोव्हेंबर २०२५ रोजी महेश यांना स्वतःच्या घराशेजारील पिसाळलेल्या कुत्र्याने पाठीमागून पायाच्या गुडघ्याजवळ चावा घेतला होता. त्यानंतर त्यांनी तातडीने यवत येथील ग्रामीण रुग्णालय व पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेतले होते. रेबीज प्रतिबंधक इंजेक्शनचा कोर्सही पूर्ण करण्यात आला होता.

सुरुवातीला प्रकृती स्थिर असल्याचे दिसत होते. मात्र, सुमारे आठवडाभरापूर्वी अचानक त्रास सुरू झाला. खामगाव येथील खाजगी रुग्णालय आणि यवत येथील शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर रेबीजची लक्षणे आढळून आली. पुढील उपचारासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना बाणेर येथील नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले.तपासणीनंतर डॉक्टरांनी महेश यांना रेबीज झाल्याचे स्पष्ट केले. उपचार सुरू असतानाच दि. ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

लग्नाच्या उंबरठ्यावर असताना काळाचा घाला

महेश यांच्या लग्नाच्या हालचाली सुरू होत्या. स्थळ निश्चित झाले असून दि. ७ फेब्रुवारी रोजी लग्नाची तारीख ठरविण्याचा कार्यक्रम होणार होता. मात्र, त्याआधीच काळाने झडप घातल्याने परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.महेश यांच्या पश्चात आई-वडील, एक विवाहित भाऊ, एक विवाहित बहीण, चुलते असा मोठा परिवार आहे. महेश हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दौंड तालुका संघटक काळूराम नागवडे यांचे पुतणे होत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago