महापालिकेच्या २२७ वॉर्डसाठी २७०० हून अधिक इच्छुकांनी दिल्या मुलाखती
मुंबई: मुंबई महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेनेतून निवडणूक लढवण्यासाठी हजारो इच्छुकांनी गर्दी केली आहे. शिवसेनेकडून आज इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यात २४०० हून अधिक इच्छुकांनी मुलाखत दिल्याची माहिती शिवसेना नेते व माजी खासदार राहुल शेवाळे यांनी दिली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या शीतल म्हात्रे उपस्थित होत्या.
उपनेते राहूल शेवाळे म्हणाले की,महापालिका निवडणुकीत शिवसेना पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी हजारो इच्छुक आहेत. पालिका निवडणूक शिवसेना महायुती म्हणूनच लढणार आहे मात्र निवडणुकीत योग्य उमेदवार असावा यासाठी पक्षाकडून आज रंगशारदा येथे मुलाखत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील लोकसभा मतदार संघनिहाय इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पक्षाकडून प्रत्येक लोकसभा क्षेत्रासाठी तीन निरीक्षकांची यासाठी नियुक्ती करण्यात आल्याचे शेवाळे म्हणाले.
मुंबईत सर्व पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या पण कोणालाही इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला नाही जो शिवसेनेला मिळाला असे शेवाळे म्हणाले. २२७ वॉर्डसाठी २४०० हून अधिक जणांनी मुलाखत दिली आहे. यात मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी सुद्धा शिवसेना पक्षासाठी मुलाखती दिल्याचे ते म्हणाले. अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी राज्यात आणि मुंबईत केलेल्या विकास कामांनी एक प्रभावी छाप पाडली आहे. त्यामुळे शिवसेनेला विजयाची खात्री आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांचा जनमानसात प्रभाव असल्याने शिवसेनेला इच्छुकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…
नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…
मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…
मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…