महाराष्ट्र

महापौर-उपमहापौर निवडणुकीत तिरंगी लढत; राष्ट्रवादीच्या ऐनवेळच्या उमेदवारीने ‘ट्विस्ट’

पुणे: महापालिका निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा एकहाती सत्ता मिळवल्यानंतर भाजपकडून मंगळवारी महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्याचवेळी कॉंग्रेस पक्षानेही विरोधी भूमिका कायम ठेवत दोन्ही पदांसाठी आपले उमेदवार जाहीर केले. मात्र, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने ऐनवेळी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महापौर-उपमहापौर निवडणुकीत मोठा राजकीय ‘ट्विस्ट’ निर्माण झाला आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत भाजप, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकीत भाजपने तब्बल ११९ जागांवर विजय मिळवत महापालिकेवर आपला दबदबा कायम ठेवला आहे. मंगळवारी महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. त्यानुसार भाजपकडून महापौर पदासाठी मंजूषा नागपुरे, तर उपमहापौर पदासाठी भाजप-रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) यांचे परशुराम वाडेकर यांनी अर्ज दाखल केले.

दरम्यान, कॉंग्रेस पक्षानेही महापालिकेत विरोधी भूमिका कायम ठेवत महापौर पदासाठी अश्विनी लांडगे, तर उपमहापौर पदासाठी साहिल केदारी यांना उमेदवारी दिली. शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी या नावांची घोषणा केल्यानंतर दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवार देणार की नाही, याबाबत मंगळवारी सकाळपासूनच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी “राष्ट्रवादी कॉंग्रेसला मत म्हणजे भाजपला मत,” असे विधान करत टीका केली होती. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये हालचाली वाढल्या. गटनेते अ‍ॅड. निलेश निकम, शहराध्यक्ष सुनील टिंगरे आणि आमदार चेतन तुपे यांच्यात बैठक झाली. पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करून राष्ट्रवादीने ऐनवेळी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून महापौर पदासाठी शीतल सावंत, तर उपमहापौर पदासाठी दत्ता बहिरट यांची नावे निश्चित करण्यात आली. सावंत आणि बहिरट यांनी तात्काळ आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. सुरुवातीला ही निवडणूक केवळ औपचारिक ठरेल, असे चित्र होते. मात्र, राष्ट्रवादीच्या नाट्यमय निर्णयामुळे ही निवडणूक आता तिरंगी लढतीत रूपांतरित झाली आहे.

राष्ट्रवादी लढणार की माघार घेणार?

महापौर व उपमहापौर पदासाठीची मतदान प्रक्रिया येत्या सोमवारी (ता. ९) होणार आहे. याच दिवशी उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. या कालावधीत राष्ट्रवादी कॉंग्रेस निवडणूक लढवणार की माघार घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

2 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

2 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

2 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

2 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

3 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

8 तास ago