क्राईम

खराडीत एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या दोघांना अटक; साडेबारा लाखांचे अमली पदार्थ जप्त

 

 

पुणे: खराडी परिसरात एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी मंगळवारी (ता. ३) पहाटे अटक केली. आरोपींकडून साडेबारा लाख रुपये किमतीचे २७ ग्रॅम एमडी ड्रग्जसह एकूण १२ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मोतीसिंह श्रवणसिंह राजपुरोहित (वय २८, रा. वाघोली; मूळ रा. जोधपूर, राजस्थान) आणि हरीश सुजनाराम देवासी (वय २२, रा. वाघोली; मूळ रा. बाडमेर, राजस्थान) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी पथक ३ फेब्रुवारी रोजी पहाटे खराडी परिसरात गस्त घालत होते. आयटी पार्क फेज-दोन परिसरात दोघेजण संशयास्पद हालचाली करताना आढळून आले. त्यांची झडती घेतली असता २७ ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि इतर साहित्य सापडले. यामध्ये ड्रग्जसह इतर साहित्य मिळून एकूण १२ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलिस निरीक्षक पंडित रेजीतवाड, सहाय्यक निरीक्षक नितीनकुमार नाईक आणि पोलिस उपनिरीक्षक अस्मिता लाड यांच्या पथकाने केली.दरम्यान, शहरातील अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago