अमरावतीतील एका खाजगी रुग्णालयात बच्चू कडू यांच्यावर उपचार सुरु
मुंबई: मागील काही दिवसांपासून राज्यातील आमदारांच्या अपघाताची मालिकाच सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार जयकुमार गोरे, आमदार धनंजय मुंडे, आमदार योगेश कदम यांच्या कारचा अपघात झाला होता. त्यातच आता प्रहार संघटनेचे नेते, माजी मंत्री बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. रस्ता ओलांडताना दुचाकीने बच्चू कडू यांना धडक दिली आहे. या अपघातात बच्चू कडू गंभीर जखमी झाले आहेत.
आज ( ११ जानेवारी ) सकाळी अमरावतीत 6 ते साडेसहाच्या दरम्यान बच्चू कडू रस्ता ओलांडत होते. तेव्हा एका दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. या दुचाकीच्या धडकेत बच्चू कडू गंभीर जखमी झाले आहेत. अमरावतीतील एका खाजगी रुग्णालयात बच्चू कडू यांच्यावर उपचार सुरु असून डोक्याला, हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. तसेच बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके पडले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…