महाराष्ट्र

एसी बसने लोणावळा टूर, तिकीट फक्त 500 रुपये; पटकन करा प्लॅनिंग

पुणे: महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) प्रवाशांच्या सोयीसाठी आपल्या पर्यटन बससेवेचा विस्तार केला आहे. पर्यटकांच्या प्रचंड प्रतिसादाला पाहून, PMPML ने पुणे ते लोणावळा मार्गावर नवीन पर्यटन बससेवा सुरू केली आहे.

यामुळे पुणेकरांना आणि बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना निसर्गरम्य लोणावळा तसेच ऐतिहासिक एकवीरा देवी मंदिराला भेट देणे अधिक सोपे आणि आरामदायी होणार आहे. PMPML ची ही विशेष सेवा 18 जुलै 2025 पासून सुरू झाली. PMPML ही सेवा ‘पुणे पर्यटन’ अंतर्गत सुरू करण्यात आली असून, आता प्रवाशांना लोणावळ्याचा प्रवास अधिक सुखकर आणि परवडणारा होणार आहे.

कुठे कुठे फिरता येणार?

PMPML ची ही पर्यटन बस पुणे येथून सुटून एकवीरादेवी मंदिर, कार्ला लेणी, वॅक्स म्युझियम, भुशी डॅम आणि मनशक्ती ध्यान केंद्र या महत्त्वाच्या पर्यटन स्थळांना भेट देईल. ही सर्व ठिकाणे पावसाळ्यात पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असतात. पर्यटकांचा प्रवास आणखी आरामदायी व्हावा यासाठी वातानुकूलित ई-बस वापरल्या जात आहेत.

बस कुठून सुटणार

ही बस सकाळी 7.30 वाजता पुण्याहून सुटेल आणि सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत परत पोहोचेल. यामुळे प्रवाशांना दिवसाभरात सर्व प्रमुख स्थळांना भेट देण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. या पर्यटन बसेस पुणे स्टेशन, स्वारगेट आणि डेक्कन जिमखाना येथून सुटतील.

तिकीट दर

या प्रवासासाठी फक्त 500 रुपये तिकीट आकारले जाईल. हा अत्यंत परवडणारा दर असल्याने सर्वसामान्य प्रवाशांनाही या सेवेचा लाभ घेता येणार आहे. जर ग्रुपने सहल काढण्याचा विचार असेल, तर 33 प्रवाशांनी ग्रुप बुकिंग केले, तर त्यातील 5 प्रवाशांना तिकीट दरात 100 टक्के सवलत मिळेल. म्हणजेच 5 जणांचा प्रवास पूर्णपणे मोफत होईल.

बुकिंग कुठे करायची

तिकिटांचे बुकिंग सकाळी 7.00 ते रात्री 9.00 वाजेपर्यंत करता येईल. अधिक माहितीसाठी किंवा बुकिंगसाठी ‘पुणे पर्यटन – गुरव’ यांच्याशी 9860509682 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच, हेल्पलाइन क्रमांक 020-24545454 देखील उपलब्ध आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago