ऍड. गुलाबराव घोरपडेंच्या निधनाने काँग्रेसने निष्ठावान कार्यकर्ता गमावला…

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. गुलाबराव घोरपडे यांचे निधन अत्यंत धक्कादायक व मनाला वेदना देणारी घटना आहे. घोरपडे हे काँग्रेस विचारांचे पाईक होते, शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी काँग्रेसचा विचार सोडला नाही. घोरपडे यांच्या निधनाने काँग्रेसने एक निष्ठावान कार्यकर्ता गमावला आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.

अॅड. गुलाबराव घोपरडे यांनी कोल्हापुर जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. मननिळावू स्वभाव, दांगडा जनसंपर्क व जनतेच्या कामासाठी सदैव तत्पर असणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. घोरपडे यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्षपद दहा वर्ष भुषवले, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे निरीक्षक अशा विविध पदांवर ते कार्यरत होते. त्यांच्या अकाली जाण्याने कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच काँग्रेस कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे.

अॅड. गुलाबराव घोरपडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी घोरपडे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago