महाराष्ट्र

बळीराजा अडचणीत असताना शिंदे सरकारला मात्र शेतकऱ्यांचा विसर

मुंबई: राज्यातला बळीराजा अडचणीत असताना विद्यमान शिंदे सरकारला आपल्या संविधानिक कर्तव्याचा विसर पडला आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

गेले काही दिवस महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे फळबागांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामध्ये द्राक्ष, काजू, संत्रा, केळी अशा फळांचा समावेश आहे. शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याचे चित्र पहायला मिळत आहे असेही महेश तपासे म्हणाले.

एकीकडे महाराष्ट्रातला शेतकरी उध्वस्त झालेला असताना राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळातील इतर मंत्री आमदार,खासदार हे बळीराजाला वाऱ्यावर सोडून प्रभू श्रीरामाच्या दर्शनाकरिता अयोध्येला गेले आहेत. प्रभू श्रीरामाचा आदर्श सांगणारे मुख्यमंत्री हे कर्तव्य विसरून राजकारणासाठी अयोध्येला गेले हे आज महाराष्ट्राने पाहिले असल्याचा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.

भक्ती भावाने एकटे गेले असते तर राज्यातील जनता समजू शकली असती परंतु संबंध मंत्रिमंडळ, आमदार,खासदार व कार्यकर्त्यांना घेऊन जाणे म्हणजे राजकीय स्टंटबाजी करणे असा त्याचा अर्थ होतो असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

10 तास ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

1 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

2 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

2 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

5 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

1 आठवडा ago