महाराष्ट्र

MPSC पेपरफुटीचा आरोप; तरुणांच्या भवितव्याशी खेळ थांबवा, अन्यथा भाजपाला महागात पडेल; हर्षवर्धन सपकाळ

टीईटी, नीटनंतर आता ड्रग इन्स्पेक्टर भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका WhatsAppवर फिरल्याचा दावा; उद्योगबंदी आणि शालार्थ घोटाळ्यावरही सरकारवर हल्लाबोल 

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील परीक्षा व्यवस्थेवर आणि भाजपा सरकारवर जोरदार टीका करत MPSCच्या ड्रग इन्स्पेक्टर भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच WhatsAppवर फिरल्याच्या तक्रारी येत असल्याचा दावा केला. नीट आणि टीईटीनंतर आणखी एका पेपरफुटीच्या आरोपामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याचे ते म्हणाले.

सपकाळ यांनी आरोप केला की, पेपरफुटी, निकालातील घोटाळे आणि गुणांतील गैरव्यवहारांच्या तक्रारी व पुरावे समोर येत असतानाही सरकार आणि संबंधित यंत्रणा गंभीर नसल्याचे दिसत आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. पेपरफुटीमागील रॅकेट आणि त्याला कोणाचा राजकीय वरदहस्त आहे, याची उत्तरे सरकारने द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली.

शालार्थ घोटाळ्याचाही उल्लेख करत सपकाळ यांनी भाजपाशी संबंधित नेत्यावर कारवाई झाल्याचा संदर्भ देत शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप केला. बनावट शालार्थ आदेशांच्या माध्यमातून शासनाची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा दावाही त्यांनी केला.

उद्योग क्षेत्रावर भाष्य करताना, २०२३ ते २०२६ या कालावधीत महाराष्ट्रातील २८,७६४ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग बंद झाल्याचा दावा सपकाळ यांनी केला. उत्पादन खर्चातील वाढ, वित्तपुरवठ्याच्या अडचणी, भ्रष्ट प्रशासन आणि गुंडागर्दीमुळे उद्योग बंद पडत असून त्यामुळे रोजगाराच्या संधी कमी होत असल्याचे त्यांनी म्हटले.

शिक्षण आणि रोजगार या दोन्ही आघाड्यांवर राज्यातील तरुणांचे भविष्य धोक्यात आल्याचा आरोप करत, ही परिस्थिती कायम राहिल्यास जनतेत तीव्र नाराजी निर्माण होईल, असा इशाराही हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

13 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

4 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

4 दिवस ago