महाराष्ट्र

राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर ॲड संग्राम शेवाळे यांची नियुक्ती

 

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या राज्य युवा धोरण समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून ॲड संग्रामसिंह नाथाभाऊ शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लंडन येथे कायद्याचे उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतात परतताच त्यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अनेक राज्यव्यापी उपक्रम राबवले. विद्यार्थी, युवक तसेच विविध समाजघटकांच्या प्रश्नांवर ते सातत्याने काम करीत आहेत.

राज्य सरकारने दिलेल्या या संधीबद्दल त्यांनी माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, क्रीडा व युवक कल्याणमंत्री माणिकराव कोकाटे तसेच संबंधित विभागातील अधिकारी यांचे मनःपुर्वक आभार मानले.

“या समितीच्या माध्यमातून युवकांसाठी शिक्षण, रोजगार, क्रीडा, सामाजिक नेतृत्व आणि आत्मनिर्भरतेचे नवे व प्रभावी मार्ग शोधण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असेल. महाराष्ट्रातील युवकांच्या स्वप्नांना बळ देणारे, त्यांना संधी उपलब्ध करुन देणारे आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल करणारे धोरण निर्माण करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन,” असे निवडीनंतर ॲड संग्रामसिंह शेवाळे यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

23 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

23 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

23 तास ago