महाराष्ट्र

अहमदनगरमधील विवाहाची जोरदार चर्चा; शुभ मंगल नव्हे तर…

अहमदनगर: लग्न सोहळ्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजे मंगलाष्टके. हळद समारंभ, मेहंदी, वरात जेवणावळी, मानपान यापेक्षा सर्वात जास्त महत्त्वाचे स्थान मंगलाष्टकांना असते, तरच लग्न समारंभ खऱ्या अर्थाने संपन्न झाला असले समजले जाते. हिंदू धर्मात किंवा भारतीय संस्कृतीत याला महत्त्वाचे स्थान आहे. परंतु अहमदनगर शहरात मंगलाष्टकाशिवाय एक लग्न समारंभ पार पडला, त्यामुळे ‘सावधान. ‘ वगैरे चा निनाथ आवाज तिथे घुमलाच नाही, मात्र त्याऐवजी छत्रपती शिवरायांचे पोवाडे सर्वांना ऐकू येत होते.

अहमदनगरच्या थोरात आणि धिसले परिवारातील योगिनी आणि विकास यांच्या विवाहसोहळ्यात मंगलअष्टका म्हटली गेली नाहीत. मात्र, या दोन्ही परिवाराने हा विवाह सोहळा हटक्या पद्धतीने पार पाडला. केवळ आठवणीत राहण्यासाठी नाही तर या विवाह सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचे असलेले आपल्या जीवनातील अनन्य साधारण महत्व आलेल्या वऱ्हाडी मंडळींपर्यंत पोहचावे हा त्यांचा हेतू होता. यासाठी त्यांनी मंगल अष्टकाऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करत लग्न सोहळा पार पाडला. विशेष म्हणजे आलेल्या पाहुण्यांचा सत्कारावर होणाऱ्या खर्चाला फाटा देत त्यांनी तो खर्च शिक्षण संस्था आणि विविध मंदिरांना दान म्हणून दिला.

दोन्ही कुटुंबं उच्चशिक्षित आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी या महाराष्ट्राला प्रेरणा दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरात कुटुंब हे निस्सीम भक्त आहेत. त्यामुळे हे लग्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने आणि स्फूर्तीने व्हावे, अशी दोन्ही कुटुंबियांची इच्छा होती. त्यानुसार हा अनोखा विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. या अनोख्या विवाह सोहळ्या जोरदार चर्चा सुरू आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

8 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

8 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

8 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

23 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago