क्राईम

शिरुर तालुक्यात पुणे-नगर महामार्गावर अपघातात तरुणाचा मृत्यू…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरीरल कारेगाव येथील कारेश्वर मंदिरासमोर बुधवारी (ता. २८) रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास एका ट्रकच्या धडकेत शुभम गोरख राक्षे (वय 23) हा तरुण मृत्यूमुखी पडला आहे. याबाबत ट्रकचालक आकाश तातेराव मुसळे (वय 23, रा. मेडशी, ता. मालेगाव, जि. वाशिम) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत युवकाचे वडील गोरख महादेव राक्षे (रा. रांजणगाव सांडस, राक्षेवाडी, ता. शिरुर, जि पुणे) यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 जून 2023 रोजी रात्री 11:15 च्या सुमारास कारेगाव येथील कारेश्वर मंदिराच्या समोर पुणे-नगर महामार्गावर असणाऱ्या रस्ता दुभाजकालगत ट्रक क्रं MH 38 X 4441 ने शुभम गोरख राक्षे (वय 23) याच्या दुचाकीस धडक दिल्याने त्याच्या डोक्याला तसेच छातीस गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

शुभमचे वडिल गोरख राक्षे यांनी ट्रकचालकाविरोधात रांजणगाव पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार मारुती पासलकर हे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

7 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago