महाराष्ट्र

अजित पवारांचा मृत्यू हा अपघात नाही, तर षडयंत्रच! राखी सावंतचा खळबळजनक आरोप

बारामती: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामतीत लँडिंग करताना चार्टर्ड विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले. या दुर्घटनेनंतर विमानाला भीषण आग लागली होती. या अपघातात अजित पवार यांच्यासह दोघे वैमानिक कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक, अंगरक्षक विदीप जाधव तसेच फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे.

या दुर्घटनेनंतर अनेक राजकीय नेते, कलाकार आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला असून, अभिनेत्री राखी सावंत हिने याप्रकरणी वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करताना राखी सावंतने या घटनेमागे राजकीय षडयंत्र असल्याची शंका व्यक्त केली.

राखी सावंत म्हणाली, “मी अजित दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले आहे. त्यांच्या जाण्याने मला खूप दुःख झाले आहे. कोणी काहीही म्हणो, पण मला वाटते की यामागे राजकारण आहे. हा अपघात नसून एक षडयंत्र आहे. ते आमचे आवडते नेते होते. हे षडयंत्र आहे, बरोबर ना?” असे वक्तव्य तिने माध्यमांशी बोलताना केले. तिच्या या विधानामुळे चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी संयम राखण्याचे आवाहन केले आहे. जामनेर येथे आयोजित श्रद्धांजली सभेत बोलताना ते म्हणाले की, “विमान दुर्घटनेची सखोल चौकशी निश्चितच केली जाईल, मात्र अशा दुर्दैवी प्रसंगी कोणत्याही प्रकारचे राजकारण होऊ नये. ही वेळ एका महान नेत्याला सन्मानाने निरोप देण्याची आणि त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होण्याची आहे.”

जामनेर येथील नगरपालिका चौकात झालेल्या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत नागरिकांसह विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अजित पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी भावना अनावर झालेल्या महाजन यांनी, “अजितदादा केवळ ज्येष्ठ नेते नव्हते, तर ते एक दिलदार मित्र आणि दमदार नेता होते,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

अजित पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या अचानक जाण्याने समर्थकांमध्ये तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव गणपती येथे ३ ऑक्टोबर रोजी भव्य महास्वच्छता अभियान; ५ हजार विद्यार्थी…

रांजणगाव गणपती : राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त निर्मलग्राम…

2 तास ago

शिरूरचा शेतकरी दुष्काळात होरपळतोय; लोकप्रतिनिधी वाढदिवसाच्या जल्लोषात; फ्लेक्स, बॅनर अन् वाढदिवसाच्या उधळपट्टीवर शेतकऱ्यांचा संताप…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला…

1 दिवस ago

शिरूर गोळ्यांच्या आवाजाने हादरतोय; पाच घटनांमध्ये तिघांचा मृत्यू, एकाचा गंभीर मारहाणीत बळी…

शिरूर (तेजस फडके) : शांत, शेतीप्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्याची ओळख आता गुन्हेगारीच्या…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यातील दोन हवालदारांवर एसीबीची कारवाई; एकाने घेतली लाच तर दुसरा झाला पसार…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलिस हवालदारांनी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

2 दिवस ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

2 दिवस ago