ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव, जनसंपर्क आणि अभ्यासपूर्ण कामकाजाचा मंत्र दिला. “लोकप्रतिनिधी हा नगराचा मालक नसून जनतेचा सेवक आहे. पदाचा अहंकार न ठेवता कार्यकर्ता म्हणून लोकांमध्ये राहा. नागरिकांच्या अडचणी स्वतःच्या समजून सोडवा आणि विकासाच्या प्रत्येक निर्णयात पर्यावरणाचा विचार करा,” असे आवाहन त्यांनी केले.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे आयोजित प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करताना शिंदे म्हणाले, “Chief Minister म्हणजे Chief Servant”. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री ही पदे तात्पुरती असली तरी कार्यकर्ता ही ओळख कायमची असल्याचे त्यांनी सांगितले.
शिंदे यांनी लोकप्रतिनिधींना नागरिकांचे फोन उचलणे, नियमित जनसंपर्क ठेवणे, स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक, पर्यावरण, पुनर्विकास आणि पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम केल्यास विकास अधिक वेगाने होतो, असेही त्यांनी नमूद केले.
पर्यावरण संवर्धनावर भर देताना विकासकामांमध्ये वृक्षतोड टाळावी, आवश्यक असल्यास त्यापेक्षा अधिक वृक्षारोपण करावे, असे सांगत हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक विकासाची गरज त्यांनी अधोरेखित केली.
यावेळी त्यांनी मेट्रो, अटल सेतू, ठाणे-बोरिवली बोगदा, क्लस्टर पुनर्विकास, समृद्धी महामार्ग यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांचा उल्लेख करत राज्यातील विकासकामांची माहिती दिली. तसेच महापालिकांमध्ये दर्जेदार, पारदर्शक आणि वेळेत काम करणाऱ्या यंत्रणेलाच प्राधान्य दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
महापालिकांनी प्रभागनिहाय स्वच्छता स्पर्धा आयोजित करावी. सर्वोत्कृष्ट स्वच्छ प्रभाग निवडणाऱ्या महापालिकेला राज्य सरकारकडून एक कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल, अशी घोषणाही शिंदे यांनी केली.
“राजकारणात संपत्तीपेक्षा माणसं कमवा, लोकांचा विश्वास जिंका आणि सेवाभाव कायम ठेवा,” असे आवाहन करत त्यांनी प्रशिक्षणातून मिळणारे ज्ञान प्रत्यक्ष कामात उतरवण्याचे आवाहन लोकप्रतिनिधींना केले.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…
आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…
एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…
मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…
सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…
मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेते सतीश पुळेकर यांची एकेकाळची गाजलेली मैत्री…