मुंबई: विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं, राज्यात लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. राज्यात महायुतीचे 232 उमेदवार विजयी झाले, तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं, पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आल.
दरम्यान त्यानंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते हे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करताना दिसत आहेत.
दरम्यान राज्यात आता काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. प्रतिभा शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, त्या राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती, अखेर त्यांनी आज राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. आज जळगावमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला, या मेळाव्यात त्यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला.
आम्ही सत्तेवर असलो तरच निर्णय घेऊ शकतो, आम्ही सत्तेत असलो तर धोरण ठरवू शकतो. प्रतिभा शिंदे ताई तुम्हाला राष्ट्रवादीत येण्याची चूक केली असं कधीही वाटणार नाही, आमचे सर्व सहकारी तुमच्यासोबत एकत्र काम करतील. गेल्या 35- 40 वर्षांत आम्ही अनेक चढउतार पाहिले, सत्ता असताना प्रश्न सुटतात, सत्ता नसताना काय अडचणी येतात हे अनुभवलं, असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी हा पक्ष प्रवेश झाल्यामुळे जळगावमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद आता वाढणार आहे.
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…