महाराष्ट्र

अलिबाग जमीनवाद प्रकरण पेटलं; ‘माहिती बाहेर काढली तर राहुल नार्वेकर यांना राजीनामा द्यावा लागेल’

अलिबाग: अलिबागमधील म्हात्रोळी गावातील जमीन मोजणीच्या वादातून उफाळलेलं प्रकरण आता राज्याच्या राजकारणात चांगलंच तापलं आहे. विधानसभा अध्यक्ष Rahul Narwekar यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार Sanjay Raut यांनी गंभीर आरोप करत थेट हल्लाबोल केला आहे.

राऊतांचा आरोप काय?

राऊत यांनी दावा केला की, गावातील जमीन एका गुजराती उद्योगपतीच्या फार्महाऊससाठी घेण्याचा प्रयत्न सुरू होता आणि त्या संदर्भातच नार्वेकर अलिबागला गेले होते. “मी आणखी माहिती बाहेर काढली तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल,” असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राऊत पुढे म्हणाले की, “मी अलिबागचा आहे. मला संपूर्ण माहिती आहे. योग्य वेळी सर्व गोष्टी बाहेर येतील.” त्यांनी गुजरात लॉबीचा उल्लेख करत काही उद्योगपतींच्या जमीन खरेदीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

नार्वेकरांचे स्पष्टीकरण

दरम्यान, आरोपांनंतर स्वतः राहुल नार्वेकर यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की, ते आपल्या शेतजमिनीवर जात असताना दोन शेतकऱ्यांमध्ये वाद सुरू असल्याचे दिसले. “मी फक्त त्यांना शांततेत वाद मिटवण्याचा सल्ला दिला आणि पुढे निघून गेलो. त्या वादाशी माझा कोणताही संबंध नाही. विनाकारण माझे नाव जोडू नये,” असे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्याचा खुलासा

म्हात्रोळी येथील संबंधित शेतकरी रमेश पाटील यांनीही पुढे येत नार्वेकर यांचा या वादाशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. जमीन मोजणीदरम्यान वाद झाला असताना नार्वेकर तेथून जात होते आणि त्यांनी फक्त समजावून सांगितल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच व्हायरल व्हिडिओचा गैरवापर करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

राजकीय वातावरण तापलं

एकीकडे राऊत यांचा आक्रमक पवित्रा आणि दुसरीकडे नार्वेकर यांचे स्पष्टीकरण यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघाले आहे. या प्रकरणात पुढे कोणते नवे खुलासे होतात आणि आरोप-प्रत्यारोपांचा हा सिलसिला कुठपर्यंत जातो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विधान परिषद निकालाने भाजपला जनतेचा इशारा; महायुतीच्या परतीचे दिवस सुरु;  विजय वडेट्टीवार

‘संघभूमीतही भाजपचा प्रभाव दिसला नाही’; ओबीसी आरक्षणावरून सरकारला घेरले, १ नोव्हेंबरच्या दिल्ली आंदोलनाची घोषणा नागपूर:…

1 मिनिट ago

‘भ्रष्टाचाराच्या मलईसाठी गुजरातच्या कंपनीला सह्याद्री विकला’; हर्षवर्धन सपकाळ

कर्जत-भीमाशंकरच्या जंगलातील वृक्षतोडीवरून काँग्रेस आक्रमक; वनसंपदेच्या रक्षणासाठी न्यायालयात जाण्याचा इशारा कर्जत : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन…

11 मिनिटे ago

राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांचे अनुदान ऑनलाइन जमा; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

मुंबई: राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील सहाय्यक परिरक्षण अनुदानाचा पहिला हप्ता…

34 मिनिटे ago

ईव्हीएमवर विजयाचा जल्लोष, बॅलेट पेपरवर मौन का? भाजपसमर्थकांच्या भूमिकेवर सवाल!

पाचपैकी तीन जागांवर विरोधकांचा विजय; ईव्हीएमचे समर्थन करणाऱ्या राजकीय प्रचारकांनी बॅलेट पेपरच्या निकालाचेही करावे विश्लेषण…

6 तास ago

ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यासू आवाज हरपला

मुंबई: ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रताप आसबे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा सखोल अभ्यास असलेले ज्येष्ठ…

6 तास ago

नागरगाव चौफुला येथे चारचाकीची दुचाकीला जोरदार धडक; पती, पत्नी व ११ वर्षीय मुलगा जखमी

न्हावरे (अक्षय टेमगिरे): नागरगाव चौफुला ते शिरुर रस्त्यावर हॉटेल कुलस्वामिनीच्या जवळ अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला…

8 तास ago