महाराष्ट्र

राष्ट्रवादीतील सर्व गैरसमज दूर; राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा; सुनिल तटकरे

नवी दिल्ली: Sunil Tatkare यांनी आज दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व समज-गैरसमज दूर झाल्याचा दावा करत, पक्षसंघटनेची मजबूत बांधणी आणि विस्तारासाठी लवकरच राज्यव्यापी दौरा करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसंदर्भात निवडणूक आयोगाला आवश्यक ते सुधारित पत्र येत्या काही दिवसांत सादर करण्यात येईल. यासाठी पक्षांतर्गत बैठकीत सर्व नेत्यांमध्ये सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

विलीनीकरणाच्या चर्चेबाबत बोलताना Sharad Pawar यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष Shashikant Shinde आणि Supriya Sule यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडल्याने त्या विषयात आता काहीही शिल्लक राहिलेले नसल्याचे तटकरे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस हा शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांवर तसेच Yashwantrao Chavan यांच्या विचारसरणीवर चालणारा पक्ष असल्याचे सांगत, पक्षातील सर्व निर्णय एकमताने घेतले जातात आणि पक्षात लोकशाही पद्धतीने कामकाज चालते, अशी भूमिका त्यांनी मांडली.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस हा एनडीएमधील प्रमुख घटक पक्ष असून, Bharatiya Janata Party यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्यात काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. विकासाभिमुख भूमिका कायम ठेवून पुढील काळात कामांना अधिक गती दिली जाईल, असेही तटकरे यांनी नमूद केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

7 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

7 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

11 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

11 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

11 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

11 तास ago