महाराष्ट्र

इंजिनिअर तरुणाची कमाल! मुकुंद कुदळची घरगुती मशरूम शेती ठरली यशस्वी

नाशिक: शेती म्हणजे फक्त पारंपरिक पिके आणि निसर्गावर अवलंबून राहणे, ही धारणा आता हळूहळू बदलत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, कमी भांडवल आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर शेतीतूनही भरघोस उत्पन्न मिळू शकते, याचे जिवंत उदाहरण पिंपरी (ता. येवला) येथील तरुण मुकुंद कुदळ यांनी उभे केले आहे.

घरातील १०x१० खोलीतून सुरू झाला प्रवास

मुकुंद कुदळ हा मूळचा मेकॅनिकल इंजिनिअर. पारंपरिक नोकरीपेक्षा काहीतरी वेगळे आणि शाश्वत करण्याची त्याची इच्छा होती. दुष्काळी परिस्थिती आणि मर्यादित शेती उत्पन्न लक्षात घेता त्याने पर्यायी शेतीचा मार्ग निवडला. युट्यूब आणि ऑनलाइन माध्यमांतून मशरूम शेतीचे प्रशिक्षण घेत, तापमान-आर्द्रता नियंत्रण, स्वच्छता आणि कच्चा माल व्यवस्थापन याबाबत सखोल माहिती मिळवली.

घरातील अवघ्या १० बाय १० फूट खोलीत त्याने मशरूम उत्पादनाची व्यवस्था उभी केली. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी त्याला दहा हजार रुपयांपेक्षाही कमी खर्च आला.

तीन महिन्यांत उत्पादन, नियमित उत्पन्नाची सुरुवात

मशरूम शेती सुरू केल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत उत्पादन मिळू लागले. पहिल्याच टप्प्यात दर्जेदार मशरूममुळे स्थानिक बाजारातून चांगला प्रतिसाद मिळाला. कमी कालावधीत परतावा मिळत असल्याने त्याचा आत्मविश्वास वाढला आणि घरगुती स्तरावर सुरू झालेली शेती आता स्थिर उत्पन्नाचे साधन ठरली आहे.

नाशिक-मुंबई बाजारपेठेत वाढती मागणी

सध्या मुकुंदकडील मशरूमची विक्री येवला परिसरासह नाशिक आणि मुंबई बाजारपेठेत होत आहे. ताजेपणा आणि दर्जा यामुळे व्यापारी व ग्राहकांकडून सातत्याने मागणी वाढत आहे. त्यामुळे त्याला विश्वासार्ह आणि नियमित उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला आहे.

पुढील टप्पा – शेडनेट आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन

भविष्यात शेडनेट उभारून मोठ्या प्रमाणावर मशरूम शेती करण्याचा त्याचा मानस आहे. एक्स्पोर्ट क्वालिटीचे उत्पादन करून बाह्य बाजारपेठ गाठण्याचे त्याचे स्वप्न आहे. इंजिनिअर असूनही शेतीत नवे प्रयोग करणारा मुकुंद आज ग्रामीण तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

कमी भांडवल, योग्य नियोजन आणि आधुनिक माहितीचा योग्य वापर केल्यास शेतीतही उज्ज्वल भविष्य घडू शकते, हे मुकुंद कुदळ यांनी आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

3 दिवस ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

3 दिवस ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

3 दिवस ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

3 दिवस ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

3 दिवस ago

मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजप, आपच्या पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश!

राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…

3 दिवस ago