महाराष्ट्र

उबाठा गटात ‘संशय कल्लोळ’चा प्रयोग; खासदारांकडून रोज निष्ठेची परीक्षा; डॉ. ज्योती वाघमारे

मुंबई: शिवसेना खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटावर जोरदार टीका करत पक्षातील वातावरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खासदारांमधील असंतोष दडपण्यासाठी खोट्या बातम्या पेरल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

उबाठा गटात सध्या ‘संशय कल्लोळ’ नाटकाचा प्रयोग सुरू असल्यासारखी परिस्थिती असून, खासदारांना दररोज निष्ठा सिद्ध करण्यासाठी आणाभाका घ्याव्या लागत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. “खासदारांसाठी एक न्याय आणि युवराजांसाठी वेगळा का?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

डॉ. वाघमारे म्हणाल्या की, उबाठा गट संशयाच्या गर्तेत अडकला आहे. खासदारांना निष्ठा सिद्ध करण्यासाठी आदेश दिले जात असताना आदित्य ठाकरे यांच्याबाबत मात्र मौन का पाळले जाते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट” असा दुहेरी न्याय पक्षात दिसत असल्याची टीकाही त्यांनी केली.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील नेतृत्वाची आठवण करून देत त्यांनी सांगितले की, बाळासाहेब सर्वांना समान वागणूक देत आणि शिवसैनिकांना संवगडी मानत. मात्र सध्याच्या नेतृत्वाकडून कार्यकर्त्यांना घरगड्यांसारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

उबाठा गटातील खासदारांची अवस्था संशयी नवऱ्यासोबत नाईलाजाने राहणाऱ्या स्त्रीसारखी झाली असून त्यांना वारंवार निष्ठा सिद्ध करावी लागत असल्याची खरमरीत टीकाही त्यांनी यावेळी केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

22 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

22 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

22 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

22 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

22 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

22 तास ago