मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ‘हॅश टॅग बाप्पा सन्मान २०२५’ या भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘टेकेरियस डेव्हलपमेंट’ प्रस्तुत आणि ‘बँड्स मेकर’ आयोजित या उपक्रमाला ‘मुंबईचा गणेशोत्सव’ आणि ‘माई मीडिया २४’ यांचे सहकार्य लाभले असून, एनजीओ पार्टनर म्हणून मून चॅरिटेबल ट्रस्ट महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृती, परंपरा आणि जनशक्तीचे प्रतीक मानला जातो. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप देत समाजप्रबोधन, एकता आणि जनजागृतीचे प्रभावी माध्यम निर्माण केले. त्याच परंपरेचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा विशेष पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षी गणेशोत्सवाला ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केल्यानंतर या उत्सवाची जागतिक स्तरावर ओळख अधिक दृढ करण्यासाठी ‘हॅश टॅग बाप्पा सन्मान २०२५’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.हा पुरस्कार सोहळा रविवार, १४ जून २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता Yashwantrao Chavan Centre येथे आयोजित करण्यात आला आहे. सामाजिक बांधिलकी जपणारी, पर्यावरणपूरक उपक्रम राबविणारी, कलात्मक देखावे सादर करणारी तसेच वर्षभर विविध सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या नामांकित गणेशोत्सव मंडळांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात येणार आहे.कार्यक्रमास सांस्कृतिक मंत्री Ashish Shelar, मुंबईच्या महापौर Ritu Tawde तसेच अभिनेते Vijay Patkar प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
गणेशोत्सव मंडळांचे समाजासाठीचे योगदान, सामाजिक बांधिलकी आणि निष्ठा यांचा गौरव करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून, गणेशोत्सवाला जागतिक मंचावर अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जाणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ९१३६१३६१५२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…