महाराष्ट्र

सुनेत्रा पवार यांच्या गाडीचे स्टेअरिंग अनिकेत तटकरे यांच्या हाती, प्रोटोकॉलवर प्रश्नचिन्ह

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी ते मुंबईहून बारामतीकडे निघाले असताना सकाळी ८.४५ वाजता बारामती विमानतळाजवळ त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली.

अजित पवार यांच्या निधनानंतर काही तासांतच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पक्षाची धुरा हाती घेत त्यांनी वरिष्ठ नेत्यांसोबत बैठकाही घेतल्या. मात्र, शरद पवार यांनी या शपथविधीबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे सांगितल्याने पवार कुटुंबातील मतभेद चर्चेत आले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विविध दौऱ्यांमुळे सक्रिय झाल्या असतानाच आणखी एक वाद समोर आला आहे. सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्या गाडीचे स्टेअरिंग हाती घेतल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सुनेत्रा पवार बाजूच्या सीटवर बसलेल्या असताना अनिकेत तटकरे गाडी चालवत असल्याचे दिसत आहे.

या घटनेवरून विरोधकांकडून तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रोटोकॉल भंग झाल्याचा आरोप केला जात आहे. उपमुख्यमंत्र्यांना झेड श्रेणीची सुरक्षा असताना अधिकृत वाहन केवळ अधिकृत चालकानेच चालवणे अपेक्षित असते. अशा परिस्थितीत अनधिकृत व्यक्तीने वाहन चालवणे योग्य आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

सामाजिक कार्यकर्ते संदीप उदमले यांनीही या प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “दादांच्या निधनावर शंका उपस्थित होत असताना सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष का करण्यात आले? काही अनुचित घटना घडली असती तर जबाबदार कोण?” असा सवाल त्यांनी केला आहे.दरम्यान, या प्रकरणावर अद्याप अधिकृत स्पष्टीकरण आलेले नसून, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago