महाराष्ट्र

आचारसंहितेदरम्यान घेतलेल्या निर्णयांवर काँग्रेसचा सवाल; निवडणूक आयोगाने चौकशी करावी; अनंत गाडगीळ

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक तरतूद या निर्णयांना काँग्रेसचा विरोध नसला, तरी हे निर्णय विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात जाहीर करण्यात आल्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते व माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी म्हटले आहे.

गाडगीळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे विचारले की, राज्यात आचारसंहिता लागू असताना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक सवलती नेमक्या निवडणुकीच्या काळातच का जाहीर करण्यात आल्या?तसेच, नाशिकमधील निवडणूक सत्ताधाऱ्यांसाठी अडचणीची ठरत असल्याचे दिसताच तपोवन विकासासाठी दोन हजार कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी ३६ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा निर्णय जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

यातील धक्कादायक बाब म्हणजे आचारसंहितेमुळे हे निर्णय अधिकृतपणे जाहीर केले जाणार नसल्याचे बैठकीत सांगितले गेले होते. असे असताना या निर्णयांची सविस्तर माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत कोणी आणि कशी पोहोचवली, याची चौकशी निवडणूक आयोगाने करावी, अशी मागणीही गाडगीळ यांनी केली.निवडणूक नियमांचे उघड उल्लंघन होत असल्याचा आरोप करत, राज्य निवडणूक आयोग याकडे दुर्लक्ष करणार की संबंधितांवर कारवाई करणार, असा परखड सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

7 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

11 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

11 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

11 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

11 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

12 तास ago