पुणे: विधानसभेच्या २०२४ निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्षाला एकामागून एक धक्के बसत आहेत. पुण्यातील काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांनीही अखेर पक्षाचा हात सोडला असून १६ जुलै रोजी ते भाजपात प्रवेश करणार आहेत.हा पक्षप्रवेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडणार असून सासवडमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात येण्याची शक्यता आहे.
संजय जगताप यांनी २०१९ ते २०२४ या कालावधीत पुरंदर मतदारसंघाचे आमदार म्हणून काम पाहिले. मात्र २०२४ च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी त्यांचा पराभव केला. विशेष म्हणजे, २०१९ मध्ये याच विजय शिवतारेंना संजय जगताप यांनी हरवलं होतं.
जगताप यांच्याआधी संग्राम थोपटे आणि रविंद्र धंगेकर या काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनीही पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे पुण्यात काँग्रेसची गळती अधिकच गंभीर होत चालली आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, काँग्रेसची कोरडी होत चाललेली संघटनात्मक ताकद आणि नेतृत्वातील अनिश्चितता यामुळे पक्षातील अनेक नेते भविष्याचा विचार करून भाजपकडे वळत आहेत.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…