महाराष्ट्र

पॉलीटेक्निक प्रवेशासाठी अर्जाची मुदत ६ जुलैपर्यंत वाढली.

मुंबई: राज्यातील प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलीटेक्निक) अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ६ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम मुदत २ जुलै होती. मात्र विद्यार्थ्यांकडून मुदतवाढीची सातत्याने होत असलेली मागणी आणि प्रवेश प्रक्रियेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेऊन ही मुदत वाढविण्यात आली आहे.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की, अंतिम मुदतीपर्यंत राज्यभरातून १ लाख ६१ हजार ७८६ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असून, त्यापैकी १ लाख ३२ हजार ९९६ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केले आहेत.

ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पूर्तता, ऑनलाइन अर्ज, शुल्क भरणे तसेच तांत्रिक अडचणींमुळे वेळेत अर्ज पूर्ण करता आला नव्हता. अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ही अखेरची संधी देण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या प्रभावी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन उच्च व तंत्र शिक्षण अधिक विद्यार्थी-केंद्रित, पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी प्रयत्नशील असून, कोणताही पात्र विद्यार्थी केवळ मुदतीअभावी प्रवेशापासून वंचित राहू नये, हा शासनाचा उद्देश असल्याचेही त्यांनी नमूद केले.

इच्छुक विद्यार्थ्यांनी ६ जुलैपूर्वी अर्ज निश्चित करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे. प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक, नियमावली, आवश्यक कागदपत्रांची माहिती आणि ऑनलाइन अर्जाची सुविधा dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्राचा दबदबा; तावडेंना सरचिटणीसपद, भारती पवार उपाध्यक्ष

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नव्या…

12 तास ago

‘राजकारणात आलो आणि माझाच मेंदू खराब झाला’; सुजय विखें

अहिल्यानगर : अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या कामाला…

12 तास ago

लाडकी बहीण विरुद्ध लाडली बहना; रक्षाबंधनानिमित्त कोणत्या राज्यातील महिलांना किती रक्कम?

मुंबई : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांना दोन महिन्यांचे हप्ते…

12 तास ago

फडणवीसांची अचानक दिल्लीवारी; मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडींना वेग आलेला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

13 तास ago

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; गोगावलेंच्या नावावर शिक्कामोर्तब, तटकरेंचा नवा डाव?

मुंबई : अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. रायगडच्या…

13 तास ago

मृत्यूनंतर कोणता अवयव किती वेळ जिवंत असतो? यावेळी शरीरात नेमके कोणते बदल होतात

जन्माबरोबर प्रत्येक माणसाचा मृत्यूही ठरलेला असतो. कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह जाळला जातो किंवा त्यावर…

13 तास ago