महाराष्ट्र

महापुरुषांच्या साहित्याच्या पुनर्मुद्रणाला गती; संशोधनाधिष्ठित साहित्यनिर्मितीवर भर; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: समाज परिवर्तनासाठी थोर महापुरुषांच्या जीवनकार्याचे सखोल संशोधन होणे गरजेचे असून, चरित्र-साधने प्रकाशन समित्यांनी समाजोपयोगी व संशोधनाधिष्ठित साहित्यनिर्मितीला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि महात्मा जोतिराव फुले चरित्र-साधने प्रकाशन समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सहसंचालक अर्चना बोऱ्हाडे तसेच दोन्ही समित्यांचे सदस्य उपस्थित होते.

बैठकीत अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची महाराष्ट्रासह देशभरात मोठी मागणी असून उपलब्ध खंड संपल्यामुळे पुनर्मुद्रणाची गरज अधोरेखित करण्यात आली. यानुसार यापूर्वी प्रकाशित सातही खंडांचे पुनर्मुद्रण करून नव्याने प्रकाशन करण्यास मान्यता देण्यात आली.

तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या कथा, कादंबऱ्या आणि इतर साहित्यावर आधारित स्वतंत्र स्वरूपातील दहा ग्रंथांचे प्रकाशन त्यांच्या १०७ व्या जयंतीनिमित्त १ ऑगस्ट २०२६ रोजी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुंबई विद्यापीठाच्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राने गेल्या पाच वर्षांत अण्णाभाऊ साठे यांच्या संपूर्ण साहित्याचे ६५ ग्रंथ विविध भाषांमध्ये भाषांतरित केले आहेत. यामध्ये गुजरातीतील १५, हिंदीतील १५, इंग्रजीतील ३१, इंग्रजीतून रशियनमधील ३ आणि तमिळमधील २ ग्रंथांचा समावेश आहे. हे भाषांतरित साहित्य देश-विदेशातील वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावे यासाठी संबंधित भाषांतील नामांकित प्रकाशकांमार्फत उच्च दर्जाच्या छपाईसह प्रकाशन करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.

महात्मा जोतिराव फुले आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वैचारिक साहित्याचा व्यापक प्रसार करून नव्या पिढीपर्यंत त्यांचे विचार पोहोचविण्यासाठी पुनर्मुद्रण, नवीन साहित्यनिर्मिती, भाषांतरे आणि प्रकाशन या उपक्रमांना अधिक गती दिली जाणार असल्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्राचा दबदबा; तावडेंना सरचिटणीसपद, भारती पवार उपाध्यक्ष

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नव्या…

11 तास ago

‘राजकारणात आलो आणि माझाच मेंदू खराब झाला’; सुजय विखें

अहिल्यानगर : अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या कामाला…

11 तास ago

लाडकी बहीण विरुद्ध लाडली बहना; रक्षाबंधनानिमित्त कोणत्या राज्यातील महिलांना किती रक्कम?

मुंबई : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांना दोन महिन्यांचे हप्ते…

12 तास ago

फडणवीसांची अचानक दिल्लीवारी; मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडींना वेग आलेला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

12 तास ago

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; गोगावलेंच्या नावावर शिक्कामोर्तब, तटकरेंचा नवा डाव?

मुंबई : अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. रायगडच्या…

12 तास ago

मृत्यूनंतर कोणता अवयव किती वेळ जिवंत असतो? यावेळी शरीरात नेमके कोणते बदल होतात

जन्माबरोबर प्रत्येक माणसाचा मृत्यूही ठरलेला असतो. कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह जाळला जातो किंवा त्यावर…

12 तास ago