महाराष्ट्र

बदलापूर हादरला! शालेय मुलींच्या सुरक्षेसाठी पोलिसांची कडक नियमावली जाहीर

बदलापूर: बदलापूर येथे शालेय मुलींवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. शहरातील शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक आणि पालकांसाठी नवीन सुरक्षा नियमावली जाहीर करण्यात आली असून, नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या दोन वर्षांत अल्पवयीन मुला-मुलींवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. नुकत्याच एका १२ वर्षीय शालेय मुलीचा स्कूल बस चालकाकडून विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. यापूर्वीही २०२४ मध्ये नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची घटना देशभर गाजली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी १२० शाळांच्या प्रतिनिधींची बैठक घेत स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या.

काय आहेत नवे सुरक्षा नियम?

विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या प्रत्येक वाहनात जीपीएस आणि सीसीटीव्ही अनिवार्य

शालेय वाहनात पुरुष चालकासोबत महिला मदतनीस असणे बंधनकारक

चालक आणि वाहनमालकाचे चारित्र्य प्रमाणपत्र तपासणे आवश्यक

सर्व वाहनांची माहिती आरटीओमध्ये नोंदणीकृत असावी

क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी आढळल्यास कठोर कारवाई

दरमहा पालक समिती बैठक घेणे अनिवार्य

पालकांचीही जबाबदारी वाढली

पोलिसांनी पालकांना मुलांच्या प्रवासावर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. जीपीएस प्रणालीचा वापर करून मुलांच्या लोकेशनची माहिती ठेवावी, बस स्टॉप परिसरात सीसीटीव्ही असल्याची खातरजमा करावी आणि चालक-मदतनीसांची पार्श्वभूमी तपासावी, असे सांगण्यात आले आहे.

शाळांसाठी स्पष्ट इशारा

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. शाळांनी केवळ नियम कागदावर न ठेवता त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

मुलांचे बालपण सुरक्षित आणि आनंददायी राहावे यासाठी प्रशासन, शाळा आणि पालक यांच्यात समन्वय असणे अत्यावश्यक असल्याचेही बैठकीत अधोरेखित करण्यात आले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

11 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago