आरोग्य

बाळाचे कान टोचताना टाळा ६ चुका, नाहीतर लहान बाळाला होते मोठे इन्फेक्शन-वाढते दुखण…

लहान मुलांचे कान टोचणे हा आपल्याकडे पारंपरिक आणि संस्कृतीचा भाग असला तरी, यात बाळाची काळजी घेणे आवश्यक असते. लहान बाळाचे कान टोचताना जरा चुकीची पद्धत किंवा दुर्लक्ष झाल्यास बाळाला संसर्ग, वेदना किंवा इतर गंभीर समस्या होऊ शकतात. यासाठीच, बाळाचे कान टोचण्यापूर्वी डॉक्टर सांगतात त्या महत्वाच्या ६ गोष्टी कोणत्या ते पाहूयात.

थोडासा निष्काळजीपणा झाला तर ही प्रक्रिया मुलांसाठी वेदनादायक ठरू नये साठी काय करावे 

१) 6 महिन्यांनंतर बाळाची प्रतिकारकशक्ती वाढलेली असते आणि कानाची पाळी देखील थोडी मोठी व मजबूत झालेली असते. त्यामुळे हा काळ बाळाचे कान टोचण्यासाठी सर्वात योग्य मानला जातो.

२. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जर आपल्याला ६ महिन्यांपूर्वीच बाळाचे कान टोचायचे असतील तर किमान बाळाचे १४ आठवडे म्हणजेच साडेतीन महिन्यांपर्यंतचे लसीकरण पूर्ण झालेलं असावं, तेव्हाच कान टोचावे.

३. कान टोचण्यापूर्वी पालकांनी विशेष काळजी घ्यावी की, जेव्हा बाळाचे कान टोचणार असाल तेव्हा बाळ पूर्णपणे निरोगी असावं. बाळाला कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन नसावं.

४. तुम्ही जर सोनाराकडून कान टोचण्याचा विचार करत असाल, तर त्यांनी या कामात प्रशिक्षण घेतलं आहे का आणि प्रक्रिया पूर्णपणे स्वच्छ व सुरक्षित पद्धतीनं होते का, हे नक्की तपासा.

५) कान टोचण्यापूर्वी सुमारे अर्धा तास आधी बाळाच्या कानावर नबिंग क्रीम किंवा आइस पॅक लावा, ज्यामुळे वेदना कमी होतील आणि बाळाला आरामदायक वाटेल.

६) बाळाचे कान टोचल्यानंतर, कानांत घालण्यासाठी फक्त सर्जिकल स्टील किंवा सोन्याचेच कानातलेच वापरावेत. या धातूंमुळे अ‍ॅलर्जी किंवा त्वचेवर कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होण्याचा धोका कमी असतो, त्यामुळे हे दोन्ही धातू बाळाच्या नाजूक त्वचेसाठी सुरक्षित मानले जातात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

10 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago