महाराष्ट्र

आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल’ म्हणत बाळासाहेब थोरातांना जीवे मारण्याची धमकी

संगमनेर: संगमनेरमध्ये कीर्तनाच्या कार्यक्रमातून झालेले एक राजकीय वक्तव्य सध्या खूप चर्चेत आले आहे. आता ते वक्तव्य मोठ्या वादाला तोंड देत असून स्थानिक राजकारण तापले आहे. कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी थेट काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधत ‘आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल’ असे वक्तव्य केल्याने राज्यभरातून निषेध व्यक्त होत आहे.

शनिवारी रात्री घुलेवाडी येथे कीर्तनात भंडारे यांनी राजकीय भाष्य केल्याचा आरोप करण्यात आला. त्यावरून उपस्थित काहींनी आक्षेप घेत गोंधळ घातला. त्यानंतर भंडारे यांना मारहाण झाल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ सोमवारी झालेल्या आंदोलनात शिवसेना आमदार अमोल खताळ व भाजप अध्यात्मिक सेलचे अध्यक्ष तुषार भोसले सहभागी झाले. त्यांनी बाळासाहेब थोरातांच्या कार्यकर्त्यांवर हल्ल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांनी पोलिसांचा वापर करून खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा पलटवार केला.

आजी-माजी आमदार आमनेसामने

या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या संदर्भात आजी-माजी आमदार समोरासमोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा वाद अधिक चिघळण्याचे संकेत आहेत. दरम्यान, विधानपरिषदेचे आमदार व बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे यांनी आपल्या एक्स हँडलवर पोस्ट करत मामांच्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी लिहिले आहे की, ‘बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका करताना विरोधकसुद्धा शब्द जपून वापरतात. पण एका स्वतःला कीर्तनकार म्हणवणाऱ्या व्यक्तीने जे वक्तव्य केले ते वारकरी संप्रदायाला मान्य नाही. संगमनेरचे नाव काही जण मुद्दाम बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत’.

तांबे यांनी याच पोस्टमध्ये आमदार अमोल खताळ यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली असून, संगमनेरच्या सामाजिक घडीला बदनाम करण्यामागे राजकीय हेतू असल्याचे म्हटले आहे. तर पर्जन्यछायेतील दुष्काळी तालुका आज सुजलाम सुफलाम झाला आहे. यामध्ये स्व. भाऊसाहेब थोरात आणि बाळासाहेब थोरात यांचे मोठे योगदान आहे. संगमनेरच्या स्वाभिमानी जनतेला बदनामी मान्य नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

संगमनेरमध्ये कीर्तनाच्या कार्यक्रमात कोणते राजकीय वक्तव्य झाले

घुलेवाडी येथे शनिवारी रात्री आयोजित कीर्तनात कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधत “आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल” असे वादग्रस्त वक्तव्य केले, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

या वक्तव्यामुळे कोणत्या घटना घडल्या

संग्राम भंडारे यांनी कीर्तनात राजकीय आणि हिंदू-मुस्लिम भाष्य केल्याचा आरोप झाला. यावर उपस्थित काहींनी आक्षेप घेत गोंधळ घातला. त्यानंतर भंडारे यांना मारहाण झाल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली आहे.

या प्रकरणावर बाळासाहेब थोरात यांची काय प्रतिक्रिया होती

बाळासाहेब थोरात यांनी धर्माच्या व्यासपीठावरून राजकारण करून संगमनेरचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका केली. तसेच, पोलिसांचा गैरवापर करून खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा पलटवार केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मराठीवर सक्ती नव्हे, भक्ती करा’; हिंदी भाषिक रिक्षा-टॅक्सी चालकांना एकनाथ शिंदेंचे आवाहन

मुंबई : “मराठीवर सक्ती करणारी नव्हे, तर मराठीवर भक्ती करणारी गर्दी आज येथे पाहायला मिळत…

30 मिनिटे ago

रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; माहेरच्यांकडून सासरच्या छळाचा गंभीर आरोप

पुणे : बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा सण असलेल्या रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी पुण्यातील वाकड परिसरात ३२ वर्षीय…

48 मिनिटे ago

विशेष अधिवेशनाच्या चर्चेने दिल्लीचे राजकारण तापले; राष्ट्रपतींच्या आदेशाची प्रतीक्षा, सरकारच्या हालचालींवर विरोधकांची नजर

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी स्थगित होऊन १४ दिवस उलटले असतानाही अधिवेशनाच्या…

2 तास ago

भाजपचे ज्येष्ठ नेते बालगोविंद प्रसाद यादव यांचे निधन; शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार

कोडरमा : भाजपचे ज्येष्ठ नेते बालगोविंद प्रसाद यादव यांचे मंगळवारी पोखरवाडी येथील पैतृक निवासस्थानी दुःखद…

2 तास ago

एमपीएससीच्या कारभारावर वडेट्टीवारांचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांच्या हस्तक्षेपाचा आरोप

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असून आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर…

5 तास ago

पिंपळवंडीतील पीडित कुटुंबाच्या पाठीशी शासन; सुनेत्रा पवारांकडून मदतीची ग्वाही

पुणे: जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील पीडित कुटुंबीयांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित…

6 तास ago