आरोग्य

आवळ्याचे आरोग्यदायी फायदे

आवळा औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. आवळ्यात असलेले गुणधर्म आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. आवळा अनेक औषधात वापरला जातो. आवळ्यात व्हिटॅमिन-सी मोठ्या प्रमाणात असते. या व्यतिरिक्त व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, कार्बोहायड्रेट्स आणि फायबर असतात. यात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न सारखे मिनरल्स असतात, जे अनेक रोगांवर फायदेशीर असतात. जर रोजच्या आहारात आवळ्याचा समावेश केला, तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते. पचन, रोगप्रतिकारशक्ती आणि इंफेक्शन सारख्या समस्यात आवळा फायदेशीर ठरतो.

पचन समस्या: आवळ्याचा आहारात समावेश केल्यास पचनाच्या समस्या दूर होतात. पचन, बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅसची समस्या आवळ्याच्या सेवनाने दूर होते. जर अन्न पचनास त्रास होत असेल, आतड्याची हालचाल नीट होत नसेल, तर आवळ्यानं बनवलेल्या गोष्टींचा आहारात समावेश करावा.

प्रतिकारशक्ती वाढवणे: आवळ्यात असलेले व्हिटॅमिन-सी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रभावी आहे. आवळ्यापासून बनवलेल्या वस्तूंचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे रोगांशी लढण्याची शक्ती मिळते. आजाराच्या दिवसात आवळ्याचा आहारात समावेश केल्यास सर्दी सारखे संसर्ग होत नाहीत.

हाडे मजबूत होतात: आवळा हाडांसाठी फायदेशीर असतो. आवळ्यात कॅल्शियम भरपूर असते ज्याचा उपयोग हाडे मजबूत करण्यासाठी होतो. आवळा खाल्ल्यानं ऑस्टिओपोरोसिस, संधिवात, सांधेदुखी यांसारख्या हाडांशी संबंधित समस्यांमध्ये त्रास कमी होतो. हाडांचे दुखणे दूर करण्यासाठी आवळ्याचा ज्युस हा रोज सकाळी घ्यावा.

हृदयासाठी फायदेशीर: आवळा हृदयाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. आवळ्यात असलेले व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स सारखे पोषक तत्व हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. आवळ्यातील क्रोमियम बीटा हृदयाच्या मज्जातंतूंना ब्लॉकेज पासून वाचवते, ज्यामुळे हृदय चांगले कार्य करते आणि निरोगी राहते.

डोळ्यासाठी फायदेशीर: आवळा डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. आवळ्यात असलेले व्हिटॅमिन-सी आपली नजर चांगली करण्यास मदत करते. आवळ्यापासून बनवलेला मुरंबा, चटणी यासारख्या गोष्टी खाल्ल्यानं चवी सोबतच दृष्टीही वाढते.

मधुमेह: आवळ्यात असलेले पोषक तत्व मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याचे काम करते.

संसर्ग होण्यापासून बचाव: आवळ्यात असलेले पोषक घटक संसर्ग दूर करण्यासाठी प्रभावी आहेत. आवळा बॅक्टेरियाशी लढण्याचे काम करतो. हे शरीराचे डिटॉक्सिफिकेशन करते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. याच्या सेवनाने सर्दी आणि पोटाच्या संसर्गापासून मुक्ती मिळते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

43 मिनिटे ago

आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीमार थांबवा; महाराष्ट्रात पोलीस राज खपवून घेणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पेपरफुटी प्रकरणावर न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेला कथित लाठीमार अन्यायकारक असून महाराष्ट्रात…

49 मिनिटे ago

सणसवाडीत ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; बॅरलमध्ये पाणी भरून कंपनीची दिशाभूल, दोन सराईत चोरटे अटकेत

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील झेनिथ बायोकेमिकल इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीतून तब्बल ८०० लिटर डिझेल…

6 तास ago

महाराष्ट्राला ‘समग्र शिक्षा’त अधिक निधी द्या; केंद्रीय परिषदेत दादाजी भुसे यांची जोरदार मागणी

मुंबई: देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी ८.६१ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेत असतानाही ‘समग्र शिक्षा’ योजनेच्या…

6 तास ago

विद्यार्थ्यांवर लाठीमार म्हणजे लोकशाहीवरील काळा डाग; हे विद्यार्थ्यांच्या जिवावर उठलेलं निष्ठूर सरकार; विजय वडेट्टीवार

सिंदेवाही: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध…

6 तास ago

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

23 तास ago