महाराष्ट्र

बांगलादेशी शोध मोहीम की भाजप कार्यकर्त्यांसाठी नवा रोजगार; ॲड. अमोल मातेले यांचा सवाल

मुंबई: मुंबई उपनगरात कथित बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय समित्या स्थापन करण्याची घोषणा सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. मात्र ही मोहीम खरोखरच बेकायदेशीर नागरिकांविरोधात आहे की भाजप कार्यकर्त्यांना नवे ‘रोजगार’ उपलब्ध करून देण्याचा मार्ग आहे, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार चे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी केली आहे.

मुंबईमध्ये हातगाड्या, फेरीवाले, बांधकाम मजूर आणि इतर कामांमध्ये बाहेरील नागरिक मोठ्या प्रमाणावर काम करताना दिसतात. हे वास्तव अनेक वर्षांपासून सर्वांना माहिती आहे. मग भाजप सत्तेत असताना आजवर या प्रश्नावर ठोस कारवाई का झाली नाही? आणि आता अचानक समित्या स्थापन करण्याची गरज का भासली, असा सवालही मातेले यांनी उपस्थित केला.

या समित्यांमध्ये भाजपचे कार्यकर्ते असणार असल्याची चर्चा सुरू आहे. जर तसे असेल, तर उद्या हेच कार्यकर्ते हातगाड्या लावण्याचे, फेरीवाल्यांकडून हप्ते वसूल करण्याचे आणि त्यांना संरक्षण देण्याचे काम करतील, अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर काही ठिकाणी बनावट जन्म प्रमाणपत्रे, आधारकार्ड किंवा इतर कागदपत्रे मिळवून देण्याच्या रॅकेटमध्येही राजकीय संरक्षण असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत.

जर सरकार खरोखरच बेकायदेशीर नागरिकांविरोधात कारवाई करण्यास गंभीर असेल, तर सर्वप्रथम बनावट कागदपत्रांचे जाळे उध्वस्त केले पाहिजे. मात्र त्याऐवजी समित्या स्थापन करून राजकीय कार्यकर्त्यांना अधिकार देण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र दिसत आहे.

सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या समित्यांची रचना, अधिकार आणि कामकाज याबाबत संपूर्ण माहिती जनतेसमोर मांडावी. या समित्यांमध्ये प्रशासनातील अधिकारी असतील की फक्त पक्षाचे कार्यकर्ते असतील, हे स्पष्ट झाले पाहिजे. अन्यथा ही मोहीम कायद्याची अंमलबजावणी नसून राजकीय दिखावा आहे, अशी जनतेची भावना अधिक बळावेल.

मुंबईसारख्या महानगरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यासाठी राजकीय समित्यांचा आधार घेणे म्हणजे प्रशासनाच्या यंत्रणांवर अविश्वास दाखवण्यासारखे आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ पारदर्शक भूमिका जाहीर करावी, अशी मागणी ॲड. अमोल मातेले यांनी केली आहे.

.ॲड. अमोल मातेले

प्रदेश प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार

अध्यक्ष, युवक मुंबई

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

10 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

10 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

10 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

10 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

10 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

14 तास ago